Shweta Tiwari Google
मनोरंजन

'तेरे बाप का क्या जाता है'; बोल्ड श्वेता तिवारीचा नेटकऱ्यांवर तिखट पलटवार

श्वेता तिवारी सोशल मीडियावर नेहमीच तिचे हॉट फोटो शेअर करताना दिसते. कौतुकासोबतच तिला ट्रोलही अनेकदा केलं जातं.

प्रणाली मोरे

छोट्या पडद्यावरची हॉट आणि सुंदर अभिनेत्री म्हणून श्वेता तिवारीची(Shweta Tiwari) नेहमीच चर्चा असते. ती नेहमीच आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना घायाळ करताना दिसते. सोशल मीडियावर तिनं पोस्ट केलेल्या फोटोंमुळे पुन्हा एकदा इंटरनेटचा पारा चढला आहे. नव्या फोटोंमधून ती भलतीच बोल्ड दिसत आहे. तिच्या फोटोंपेक्षा तर अधिक तिच्या कॅप्शनची चर्चा रंगली आहे. ज्यामुळे सगळ्यांचं लक्ष अधिक तिच्या फोटोंकडे गेलं आहे.

श्वेता तिवारीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही नवीन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिनं मल्टीकलरचा गाऊन घातला आहे. फोटोंमध्ये श्वेता खूप हसताना दिसत आहे. या फोटोंना शेअर करत श्वेता तिवारीनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,''वे- इतना क्या हंस रही है?'', ''हम-तेरे बाप का क्या जाता है?'' श्वेता तिवारीच्या या पोस्टवर सेलिब्रिटींनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. टी.व्ही अॅक्टर फहमानने लिहिलं आहे,'त्याचा बाप मजनू आहे आणि मजनू नेहमी जळतो अगं'. चाहत्यांनी श्वेताच्या स्माइलची देखील प्रशंसा केली आहे. एका युजरनं लिहिलं आहे,'किती क्युट स्माइल आहे'. तर दुसऱ्यानं लिहिलं आहे,'तु खूपच गॉजर्स आहेस'. तर एकानं लिहिलंय,'एवढं हसायला हवं होतं का?'

श्वेता बोल्डनेसच्या बाबतीत आपली मुलगी पलक तिवारीला देखील टक्कर देते. छोट्या पडद्यावर भले ती खूप साध्या-सरळ व्यक्तिरेखा साकारताना दिसत असेल पण सोशल मीडियावर मात्र तिच्या बोल्डनेसनं आग लावते. वयाची चाळीशी पार केल्यानंतरही तिचं बोल्ड फोटोशूट पाहून चाहते नेहमीच हैराण होतात. आपल्या कामापेक्षा अधिक श्वेता सध्या फोटोशूटमध्ये अधिक बिझी दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT