Tere Pyaar Mein Esakal
मनोरंजन

Tere Pyaar Mein: किती चोरटा रे तू प्रितम! 'तू झुठी मैं मक्कार'मधील गाणं 25 वर्ष जुन्या गाण्याची कॉपी?

सकाळ डिजिटल टीम

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा रोमँटिक ड्रामा चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार' लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता नुकतचं या चित्रपटातील 'तेरे प्यार में' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात रणबीर आणि श्रद्धाची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळली. हे गाणं थोड्याच कालावधीत व्हायरलही झालं. मात्र या गाण्यावरुनही वाद सुरु झाला आहे.

'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटातील 'तेरे प्यार में' हे गाणं ''योर वुमन'' या हिट इंग्लिश ट्रॅकचीशी मिळत जुळतं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांना या गाण्याची आठवण आली आहे. त्यामुळे अनेकांनी संगीतकार प्रीतम यांच्यावर गाण्याची कॉपी केल्याचा आरोपही केला, तर काहींनी त्याचं समर्थनही केलं आहे.

एका नेटकऱ्यांने 'तेरे प्यार में'चा व्हिडिओ शेअर केला आणि त्याचबरोबर व्हाईट टाऊनच्या लोकप्रिय हॉलीवूड ट्रॅक 'योर वुमन' ही शेअर केला आहे. त्याने या दोन्ही गाण्याची तुलना केली. हे गाणे 1997 चे आहे आणि त्याचे संगीत हे प्रीतमने दिलेल्या संगीतासारखेच असल्याचा दावा केला आहे.. दोन्ही गाण्यांच्या ट्यूनवर प्रतिक्रिया देत अनेकांनी संगीत दिग्दर्शकावर इंग्रजी हिटमधून चोरी केल्याचा आरोप केला आहे.

एका ट्विटर युजर्सने कमेंट करत याला गाण्याला कॉपी म्हटले आहे. ऐकाने लिहिलयं की ' सामान्य माणसा, जर तुम्हाला गाण्यातून चांगल संगीत मिळत असेल तर ठीक आहे, पण ही 100% कॉपी नाही.' तर दुसऱ्याने लिहिले की, ' दुआ लीपा च्या प्रेमाची त्यांनी पुन्हा कॉपी केली.' तर एकानं लिहिलयं, 'प्रितम दा ने पुन्हा निराश केलं नाही.' तर काहींनी गाण्याचं समर्थन करत फक्त ट्यून सारखी आहे पण गाण्याच्या ओळी आणि संगीत वेगळं असल्याचं सांगितलं आहे.

तू झुठी मैं मक्कार या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन तर लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 8 मार्च 2023ला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

Prakash Ambedkar : भाजप, आरएसएसच्या विचारसरणीत ‘मदत’ हा शब्दच नाही; ‘वंचित’चे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

Pune News : महापालिकेची प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर होणार

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

SCROLL FOR NEXT