Shahid Kapoor 
मनोरंजन

Shahid Kapoor: शाहिदचा 'विराट' अवतार! किंग कोहलीच्या अंदाजात शेअर केला व्हिडीओ

Shahid Kapoor: शाहिदनं एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो विराट कोहलीच्या डायलॉगवर लिप सिंक करताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shahid Kapoor: अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा सध्या त्याच्या  'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शाहिद हा या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. अशताच आता शाहिदनं एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो विराट कोहलीच्या डायलॉगवर लिप सिंक करताना दिसत आहे.

शाहिदनं शेअर केला मजेशीर व्हिडीओ

शाहिद कपूरने इंस्टाग्राम अकाउंटवर एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. विराट कोहलीनं एका मुलाखतीत त्याला आवडणाऱ्या पदार्थांबद्दल सांगितलं होतं. कोहलीच्या याच मुलाखतीमधील डायलॉगवर शाहिदनं लिपसिंग केलं आहे. " प्रमोशन संपल्यानंतरची फिलिंग", असं त्या व्हिडीओवर लिहिलेलं दिसत आहे. शाहिदच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

शाहिदच्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "खूपच क्युट" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "चांगला प्लॅन आहे. "

पाहा व्हिडीओ:

"तेरी बातों में उलझा जिया" होणार रिलीज

"तेरी बातों में उलझा जिया" या शाहिद कपूरच्या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. sacnilk.com च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 93.66 लाखांचे कलेक्शन केलं आहे. या चित्रपटाला सेन्सॉरकडून यू/ए प्रमाणपत्र मिळालं आहे. या चित्रपट अभिनेत्री क्रिती सेनननं एका रोबोटची भूमिका साकरली आहे. माणूस आणि रोबोट यांच्यातील प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट उद्या (9 फेब्रुवारी) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शाहिद कपूर हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो. त्याच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT