Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya box office collection day 2 
मनोरंजन

Box Office Collection : हीट की फ्लॉप? 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'ने दुसऱ्या दिवशी कमावाले 'इतके' कोटी

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya box office collection day 2 : शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे.

रोहित कणसे

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya box office collection day 2 : शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये रिलीज झालेला हा रोमान्स कॉमेडी चित्रपट चाहत्यांना चांगलाच आवडताना दिसत आहे. या चित्रपटाने दुस-या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे,

चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली?

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'ने दुसऱ्या दिवशी भारतात 9.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र, चित्रपटाच्या कमाईची अधिकृत आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. जर चित्रपटाने आणखी 9.5 कोटींची कमाई केली असेल तर चित्रपटाचे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन 16.52 कोटी रुपये झाले आहे.

या चित्रपटाने पहिल्या दिवशीही चांगली कमाई केली होती. ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी या सिनेमाने 7.02 कोटी रुपयांची कमाई केली होती आणि दुसऱ्या दिवशी सिनेमाची कमाई वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शाहिद आणि क्रितीचा रोमान्स

चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, यात शाहिद कपूर आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. यावेळी या चित्रपटात क्रिती सेनन एका वेगळ्या अंदाजात दिसून येत आहे. क्रिती पहिल्यांदाच रोबोटच्या भूमिकेत दिसत आहे. तर शाहिद लव्हर बॉयच्या भूमिकेत आहे. चित्रपटात शाहिद कपूर एका रोबोटच्या म्हणजेच क्रिती सेननच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करू इच्छितो. या चित्रपटात शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांच्यात रोमान्स पाहायला मिळत आहे.

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाची निर्मिती मॅडॉक फिल्म्सने केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साह यांनी केले आहे. या चित्रपटात धर्मेंद्र आणि डिंपल कपाडियासारखे स्टार्सही आहेत. या चित्रपटाला चाहत्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Weather Alert : पुढचे ८ दिवस इशारा! पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस, विदर्भात उष्णतेची लाट; शेतकऱ्यांना कृषी विभागाचा महत्त्वाचा सल्ला

रुपया पुन्हा घसरला! सार्वकालिक नीचांकी पातळीवर, ७९ पैशांनी कोसळून ९५.२८ वर

IPL 2026: हैदराबाद-गुजरातमध्ये प्लेऑफ निश्चित करण्यासाठी हातघाईची लढाई; कशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन?

Maharashtra Employees DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; महागाई भत्त्यात वाढ, १ जानेवारीपासूनचा फरक मिळणार

Nida Khan: निदा खानला १४ दिवसांची कोठडी; एसआयटीकडून आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू, ‘पॉश’ कायद्याचे उल्‍लंघन..

SCROLL FOR NEXT