Thackeray
Thackeray 
मनोरंजन

'आया रे आया रे सबका बाप रे, कहते है उसको ठाकरे' 

वृत्तसंस्था

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपटाचे संगीत आज (शनिवार) लॉन्च करण्यात आले असून, 'आया रे आया रे सबका बाप रे, कहते है उसको ठाकरे' हे गाणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर हा चित्रपट आहे. बाळासाहेब ठाकरे यांची कारकीर्द, त्यांचं वैयक्तिक आयुष्य या सगळ्यांवर या चित्रपटात भाष्य केले आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

अनेक दिवसांपासून उत्सुकता असलेल्या 'ठाकरे' या चित्रपटाचे हिंदी व मराठी ट्रेलर नुकतेच वडाळा येथील आयमॅक्‍स या मल्टिप्लेक्‍समध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाचे निर्माते संजय राऊत, दिग्दर्शक अभिजित पानसे, अभिनेते नवाजुद्दीन सिद्दिकी, अमृता राव, 'वायकॉम 18'चे अजित अंधारे, निखिल साने व अन्य उपस्थित होते. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही संवाद आणि दृश्‍यांना सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्याचे बोलले जात होते.

निर्माता : व्हायकॉम 18 मोशन पिक्‍चर्स, राऊटर्स एन्टरटेंन्मेंट
दिग्दर्शक : अभिजित पानसे
कलाकार : नवाजुद्दीन सिद्दीकी, अब्दुल कादर अमीन, लक्ष्मण सिंग राजपूत, अनुष्का जाधव, निरंजन जवीर 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT