Thalapathy Vijay And Sangeetha Sornalingam
Thalapathy Vijay And Sangeetha Sornalingam Sakal
मनोरंजन

Thalapathy Vijay Divorce: टॉलीवूडमध्ये मोठी खळबळ; तब्बल 22 वर्षानंतर होणार थलपथी विजयचा घटस्फोट?

सकाळ डिजिटल टीम

थलपथी विजय आणि त्याची पत्नी संगीता हे दक्षिणेतील लव्हिंग कपलपैकी एक आहेत. मात्र सध्या दोघांच्या वेगळे होण्याच्या आणि घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. मात्र या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे, त्याची ठोस माहिती अजून येणे बाकी आहे. विजय आणि संगीता यांच्या वैवाहिक आयुष्याबाबतच्या सर्व बातम्या सध्या चर्चेत आहेत.

थलपथी विजय आणि त्याची पत्नी संगीता यांच्या घटस्फोटाच्या बातमीने इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. विजयच्या विकिपीडिया पेजवर तो आणि त्याची पत्नी परस्पर संमतीने घटस्फोट घेत असल्याचे म्हटल्यावर अफवा सुरू झाल्या. ही अफवा निराधार आहे कारण विकिपीडियाच्या पेजवर असे काहीही नमूद केलेले नाही.

या सर्व अफवांदरम्यान, पिंकविलाच्या जवळच्या सूत्राने सांगितले, "विजय आणि संगीताच्या घटस्फोटाच्या अफवा निराधार आहेत. हे कसे सुरू झाले ते आम्हाला माहित नाही." संगीता वरिसू ऑडिओ लॉन्चला उपस्थित राहिली नाही". असे वृत्त आहे की स्टारची पत्नी त्यांच्या मुलांसह यूएसमध्ये सुट्टी घालवत आहे आणि त्यामुळेच ती कोणत्याही कार्यक्रमास उपस्थित राहू शकली नाही. लवकरच विजयही आपल्या कुटुंबात सामील होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, अधिकृतपणे काहीही दुजोरा मिळालेला नाही.

पूवे उनक्कागा या चित्रपटाच्या रिलीजनंतर विजयला त्याच्या आयुष्यातील प्रेम आणि पत्नी संगीता भेटले. 1996 मध्ये, चेन्नईमध्ये शूटिंग शेड्यूल दरम्यान, अभिनेत्याची फॅन संगीता सोरलिंगमशी ओळख झाली. विजयला भेटण्यासाठी ती यूकेहून आली होती. खरं तर, त्याने तिला दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी येऊन त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यास सांगितले. लवकरच, ते एकमेकांना आवडू लागले आणि त्यांच्या पालकांनी ते मान्य केले.

या कपलने 25 ऑगस्ट 1999 रोजी एकमेकांशी लग्न केले. त्यांनी हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले. विजय आणि संगीता यांनी त्यांच्या लग्नाच्या एका वर्षानंतर जेसन संजय या पहिल्या मुलाचे स्वागत केले आणि सप्टेंबर 2005 मध्ये त्यांना दिव्या साशा ही मुलगी झाली. विजय आणि संगीता 22 वर्षांपासून एकत्र आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan : घाटकोपरची पुनर्रावृत्ती होण्यापूर्वी कारवाई करा, मोठागाव - माणकोली पूलाला लागून अनधिकृत होर्डिंग्ज

Shubman Gill Post: रोहित शर्माशी खरंच बिनसलं? गिलने 'ती' पोस्ट करत चर्चा करणाऱ्यांची घेतली शाळा

Vitamin C : त्वचेसाठी फायदेशीर असणारे ‘व्हिटॅमिन सी’ सीरम घरच्या घरी कसे बनवायचे? जाणून घ्या ‘ही’ सोपी पद्धत

Jaydutt Kshirsagar : बीडच्या काका-पुतण्याचा वाद मिटला? जयदत्त क्षीरसागरांच्या मंचावर आमदार संदीप क्षीरसागरांच्या वडिलांची उपस्थिती

Salman Khan: बिश्नोई गँगच्या नावानं सलमानला जीवे मारण्याची धमकी; 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT