Vijay Thalapathy Leo Day 1 Box Office Collection: Esakal
मनोरंजन

Leo Box Office Collection: ना 'गदर' ना 'जेलर'...पहिल्याच दिवशी विजयच्या 'लिओ'वर पैशांचा पाऊस!

थलपथी विजयच्या लिओ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

Vaishali Patil

Vijay Thalapathy Leo Day 1 Box Office Collection: : थलपथी विजय हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात लाडक्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याची क्रेझ ही खुपच जास्त आहे. थलपथीचा मोस्ट अवेटेड चित्रपट लिओ हा 19 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. विजयचे चाहते या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. आता या चित्रपटाला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

विजयच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ इतकी आहे की पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई करत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहे. दिग्दर्शक लोकेश कनगराजच्या 'लिओ'ने पहिल्याच दिवशी किती कमाई केली हे जाणुन घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक होते. आता पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे.

सकनिल्‍कच्‍या रिपोर्टनुसार, लिओने देशांतर्गत बॉक्‍स ऑफिसवर पहिल्‍याच दिवशी सर्व भाषांमध्‍ये 63 कोटी रुपयांची कमाई करत विक्रम केला आहे. फक्त तामिळनाडूमध्ये चित्रपटाने 30 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

केरळमध्ये 11 कोटी तर कर्नाटकमध्ये 14 कोटी रुपयांची कमाई लिओने केली आहे. इतकच नाही तर भारतातपेक्षा जास्त परदेशात लिओची क्रेझ आहे.

रिपोर्टनुसार, लिओने परदेशात जवळपास 66 कोटी रुपयांची केले आहेत. त्यामुळे जगभरातील या चित्रपटाचे कलेक्शन 130-140 कोटी इतके झाले आहे.

रिलीजच्या पहिल्याच दिवशी 68 कोटी रुपयांचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन करणाऱ्या 'लिओ'ने रजनीकांत स्टारर 'जेलर' आणि सनी देओल स्टारर गदर 2 ,शाहरुख खानच्या पठाणला मात दिली आहे.

'गदर 2' ने पहिल्या दिवशी 40 कोटी रुपये आणि 'पठाण' ने 57 कोटी रुपये कमवले होते. त्यामुळे आता विजयचा लिओ दोघांवर भारी पडला आहे.

या चित्रपटाला समिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी विजयच्या चाहत्यांनी धिंगाणा केला आहे. लिओबद्दल बोलायचे झाले तर विजयसोबत त्रिशा कृष्णन आणि संजय दत्त यांनी दमदार भुमिका केली आहे. या चित्रपटात संजय दत्त व्हिलनच्या भुमिकेत दिसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Priya Nair: 92 वर्षांत पहिल्यांदाच महिला CEOची निवड; HULच्या नेतृत्वाची जबाबदारी प्रिया नायर यांच्यावर

Video: दिल्ली पुन्हा 100 वर्ष मागे गेल्यासारखी दुरवस्था! पावसानंतरचा व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला लावाल हात

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

SCROLL FOR NEXT