Thalapathy Vijay Esakal
मनोरंजन

Thalapathy Vijay: थलापती असशील तू तुझ्या घरी! नियम तोडला आता दंड भर

Vaishali Patil

Thalapathy Vijay News: तामिळ चित्रपटांचा स्टार थलापती विजय हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे त्याचा आगामी सिनेमा नव्हे तर त्याचे राजकारणात पदार्पण आहे.

गेल्या काही दिवसांपासून तो राजकारणात येणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. अशातच आता तो पुन्हा चर्चेत आला मात्र यावेळी कारण वेगळ आहे.

तो अडचणीत आला आहे. विजयने केवळ एक दोन वेळा नव्हे तर दोनपेक्षा जास्त ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे.

त्यामुळे त्याचे चलन करण्यात आले. थलापती विजयला ५०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. ही घटना 11 जुलैची घडली आहे.

सोमवारी थलापती विजय हा विजय मक्कल अयक्कम (VMI) च्या सदस्यांची भेटायला गेला होता. पनयूर येथे व्हीएमआय सदस्यांची भेट घेतल्यानंतर त्याने चुक केली आणि त्याला दंड भरावा लागणार आहे.

विजयला रस्त्यावर पाहिल्यानंतर चाहते वेडे होतात. त्यामुळे चाहत्यांची गर्दी टाळण्यासाठी थलापती विजयने घाईघाईने दोनपेक्षा जास्त ठिकाणी सिग्नल तोडले.

त्यामुळे त्याला ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विजयचा सिग्नल तोडल्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर फिरत आहे.

2024 च्या अखेरीस त्याच्या चित्रपटाची शुटिंग संपवणार आहे. तो 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर तो स्वतःचा पक्ष बनवू इच्छितो आणि त्यानंतर 2026 ची तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवू इच्छितो. असा चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु आहे.

थलापती विजय लवकरच लिओ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय शाहरुख खान स्टारर 'जवान' या चित्रपटातही दिसणार आहे.

हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याआधी थलापती 'वारिसू' आणि 'बीस्ट'मध्ये दिसला होता जे बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करु शकले नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC Election: विकास फक्त शरद पवारांनीच केला, समोरासमोर चर्चेला अजितदादांचं थेट आव्हान! भाजपवर तुफान हल्लाबोल

LIC Loss : जीवन सुरक्षा देणाऱ्या LIC ची सिगारेट कंपनीत गुंतवणूक; पण बसला ११,००० कोटींचा फटका

Latest Marathi News Live Update : आम्ही आरोप केले तर अडचण होईल, भाजपचा अजितदादांना इशारा

टीकाकारांना मी त्यांच्याच... सचिन पिळगावकरांचा ट्रोलर्सवर पलटवार; चार वाक्यात विषय संपवला

Chandrapur crime News : चंद्रपूर किडनी प्रकरणातल्या आरोपीनं पोलिसांना गंडवलं, कसा दिला गुंगारा?

SCROLL FOR NEXT