koffee with Karan Season 7 sakal
मनोरंजन

'या' दिवशी येतोय 'कॉफी विथ करण'चा 7 वा सिझन, 'या' कलाकारांची होणार पोलखोल

करणन जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाच्या 7 व्या सिझनबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

नीलेश अडसूळ

koffee with karan : कलाकारांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील बऱ्या वाईट गोष्टी जाणून घेत त्यांची पोलखोल करणारा 'कॉफी विथ करण' (koffee with karan) हा कार्यक्रम गेली काही वर्षे सुरु आहे. करोनापूर्वी या कार्यक्रमाचा सहावा सिझन पार पडला होता या कार्यक्रमाचे पुढचे पर्व कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानंतर हा सीझन होणार की नाही यावरून बरीच चर्चा रंगली. का शो कायम स्वरूपी बंद होणार असल्याची एक अफवा स्वतः करणने पसरवली आणि चाहते नाराज झाले. त्यानंतर पुन्हा शो लवकरच सुरू होणार असल्याचे त्याने जाहीर केले. पण 7 वे पर्व कधी सुरू होणार याची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे, अखेर याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली आहे. (The 7th season of 'koffee with Karan' is coming on 7 july)

'कॉफी विथ करण 7' चा प्रिमिअर शो हा 7 जुलै रोजी होणार आहे. काही दिवसांपूर्वी करण अनुपमा चोप्रा यांच्या फिल्म कँपेनियनच्या चॅट शोमध्ये सामील झाला होता. या चॅट शोमध्ये करणनं 'कॉफी विथ करण'च्या नव्या सिझनबाबत सांगितलं. तो म्हणाला की, 'मी 7 जुलैला कॉफी विथ करणच्या 7 व्या सिझनचा प्रिमियर तुम्हाला दाखवण्यासाठी उत्सुक आहे.'

करण (karan johar) 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी सहभाग घेतात. आपल्या गोड शब्दात तो कलाकारांची पोलखोल करतो. त्यांच्या आयुष्यातील काही घटना लोकांसमोर आणणे, त्यांची थट्टा मस्करी करणे असे स्वरूप या कार्यक्रमाचे आहे. आमिर खान , शाहरूख खान , अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांनी या शोमध्ये हजेरी लावली होती. तर यंदाच्या पर्वात 'आलिया रणबीर', 'दीपिका रणवीर', किंवा सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान हे एकत्र उपस्थित राहतील अशी चर्चा आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Scheme : लाडक्या बहिणींनो सावधान! योजनेच्या फॉर्मसाठी जास्तीचे पैसे देताय? सरकारने उचललं 'हे' मोठं पाऊल, सेवा केंद्रचालकांचे धाबे दणाणले

Raj Thackeray: जपानी तरुणीचा व्हिडीओ व्हायरल… राज ठाकरेंनी मोहन भागवतांना विचारला थेट प्रश्न!

Destination Wedding India: डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करताय? उदयपूरशिवाय निवडा हे 4 शानदार ठिकाण, होईल शाही लग्नाचे स्वप्न पूर्ण

हायवे बनवा किंवा टोल वसुली थांबवा! रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मित्र गमावला, तरुणांचा टोल नाक्यावर गोळीबार; चिठ्ठीतून दिली धमकी

Narendra Modi cabinet meeting: मोठी बातमी! मोदी सरकार 'या' राज्याचे नाव बदलणार... कॅबिनेट बैठकीत घेणार महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT