the academy awards Oscars 2023 red carpet stars nominee ready for announcement golden trophy sakal
मनोरंजन

Oscars 2023: रेड कारपेट सजला.. तयारी झाली, कलाकार आले, आता उत्सुकता त्या सोनेरी बाहुलीची..

थोड्याच वेळात सुरू होतोय ऑस्कर पुरस्कार सोहळा..

नीलेश अडसूळ

Oscar 2023: चित्रपट क्षेत्रातील जगभरात सर्वात मानाचा पुरस्कार समजला जाणारा ऑस्कर सोहळा आज लॉस एंजेलिमधील 'डॉल्बी' थिएटरमध्ये पार पडतो आहे. अवघ्या काही मिनिटात या सोहळ्याला सुरुवात होईल.

अत्यंत दिमाखदार असा हा सोहळा असणार आहे. यंदाचा हा 95 वा ऑस्कर सोहळा असून भारतीयांसाठी तो प्रचंड महत्वाचा आहे. कारण भारताच्या 'RRR' चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला संगीत विभागातून नॉमिनेशन आहे.

हा पुरस्कार भारताकडेच यावा यासाठी तमाम भारतीय प्रार्थना करत आहेत. ह्या सोहळ्यात अभिनेत्री दीपिका पदूकोण देखील हजेरी लावणार आहे. त्यामुळे परदेशी होणाऱ्या या सोहळ्यात भारतीय आपली काय जादू दाखवतायत हे लवकरच कळेल.

मात्र या दिमाखदार सोहळ्याचे तयारीही तितकीच दणक्यात करण्यात आली आहे. 'डॉल्बी' थिएटर कडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या बाजूने रेड वाईन रंगाचे पडदे लावण्यात आले आहे. तसेच संबंध सभागृह रेड कारपेट घालून सजवण्यात आले आहे.

आकर्षक रोषणाई आणि त्यात उठून दिसणारे जगभरातील कलाकार यामुळे या सोहळ्याला एक वेगळाच रंग आला आहे. आता अवघ्या काही मिनिटात तो क्षण येईल, ज्याची सारेच जन आवर्जून वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT