मनोरंजन

स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी रिलिज झालेले दोन चित्रपट माहितीये?

आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य independent day मिळालं त्यादिवशी एक नव्हे तर दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते.

युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य independent day मिळालं त्यादिवशी एक नव्हे तर दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. फार कमी जणांना त्याबाबत माहिती आहे. एकीकडे भारत नव्या दिवसाच्या पहाटेचं स्वागत करत होता त्याच दिवशी मनोरंजन क्षेत्रानंही आपला प्रभाव दाखविण्यास सुरुवात केली होती. त्यात सिनेमा क्षेत्राचं नाव घेता येईल. वास्तविक त्यावेळी आपल्याकडे हे माध्यम तारुण्यावस्थेत होतं असं म्हणता येईल. अजून त्याला मोठा टप्पा गाठायचा होता. देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्षे झाली आहे. त्यात हिंदी चित्रपटांचे योगदानही मोठं आहे. त्यानिमित्तानं आपण हिंदी चित्रपट आणि स्वतंत्रता दिवस याविषयी जाणून घेऊयात.

जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यादिवशी म्हणजे शुक्रवारी देशात दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. 15 ऑगस्ट 1947 ची सकाळ मोठी प्रसन्नमयी होती. देशातील जनतेनं पहिल्यांदा मोकळेपणानं श्वास घेतला होता. आपण पारतंत्र्यातून मुक्त झालो. ही भावना प्रत्येकाला सुखावणारी होती. तो दिवस शुक्रवार होता. तेव्हा देखील शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर चित्रपट रिलिज होत होते. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. एक शहनाई shehnai आणि दुसरा म्हणजे मेरा गीत. mera geet

मेरा गीत या चित्रपटाविषयी बॉलीवूड अर्काइव्हमध्ये फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या चित्रपटामध्ये सुशीलकुमार आणि ज्युनिअर नसीम यांनी काम केले होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. त्याच दिवशी आणखी एक सिनेमा प्रदर्शित झाला होता त्याचे नाव शहनाई. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचे वडिल प्यारेलाल संतोषी यांनी त्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. प्यारेलाल संतोषी यांनी 1960 मध्ये मधुबाला आणि भारत भुषण यांना घेऊन बरसात की एक रात नावाचा चित्रपट बनवला होता.

शहनाईमधील गाणीही आजही काही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यातील आना मेरी जान, मेरी जान, संडे के संडे ही गाणी विशेष उल्लेखनीय आहेत. देश स्वतंत्र झाला त्यावर्षी 182 चित्रपट प्रदर्शित झाले होते. तेव्हा जुगूनु, दो भाई आणि दर्द सारखे चित्रपट सुपरहिट झाले होते. जुगूनुमध्ये दिलीप कुमार आणि नुर जहॉ यांची प्रमुख भूमिका होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५ मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास! राज ठाकरेंना अनुभवावं लागलं पुण्याचं ट्रॅफिक... रोज कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांच्या मनस्तापात भर

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण?

Pasha Patel statement : ‘’... त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार’’; अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल अन् पाशा पटेलांचं वादग्रस्त विधान!

Ganesh Chaturthi 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी घेऊन येणार मोठा ट्विस्ट, बाप्पाच्या येण्याने होणार संकटांचा विनाश

Solapur News: रहाटेवाडी-तामदर्डी पूल बांधकामासाठी कोटी ६ कोटी ५० लाख निधी मंजूर, जनतेच्या मागणीला यश

SCROLL FOR NEXT