Universal Pictures Releases a Spine Chilling Second Trailer esakal
मनोरंजन

The Exorcist Believer : हिंमत असेल तर 'द एक्सोरसिस्ट: बिलीवर' चा ट्रेलर पाहून दाखवा! हार्ट पेशंट असणाऱ्यांनी चुकूनही....

latest hollywood movies: आर युनिव्हर्सल पिक्चर्सच्यावतीनं यावर्षीचा सर्वात मोठा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याचे नाव द एक्झॉर्सिट असे आहे.

युगंधर ताजणे

Universal Pictures Releases a Spine Chilling Second Trailer : हॉलीवूडमधील भयपटांची वेगळी क्रेझ आहे. त्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद मोठा असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी हॉलीवूडच्या भयपटांनी बॉक्स ऑफिवर मोठी कमाई केली आहे. आता द एक्झॉरसिस्ट - बिलीवरचा दुसरा ट्रेलर समोर आला आहे. त्याच्यावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

आर युनिव्हर्सल पिक्चर्सच्यावतीनं यावर्षीचा सर्वात मोठा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याचे नाव द एक्झॉर्सिट असे आहे. हा चित्रपट सहा ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

त्याचा ट्रेलर इतका भयानक आहे की, अनेक नेटकऱ्यांनी तो पाहताना प्रेक्षकांनी काळजी घ्यावी असे म्हटले आहे. भयपट हा प्रेक्षकांचा अतिशय आवडीचा विषय. त्यावर आधारित चित्रपट पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल जास्त असल्याचे दिसून येते.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

एक्झॉर्सिटचा ट्रेलर हा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या चित्रपटाची कथा ही दोन मुली, एंजेल आणि तिच्या मैत्रीणीवर आधारित आहे. शाळेत शिकणाऱ्या त्या मुली जंगलात एके दिवशी गायब होतात आणि जेव्हा त्या पुन्हा येतात तेव्हा त्यांना काहीच आठवत नसते. त्या दोन्ही मुलींच्या शरीरात दोन राक्षसी आत्मे प्रवेश करतात असे दिसून येते. त्यानंतर जो प्रकार सुरु होतो तो कमालीचा थरारक आहे.

या चित्रपटाचा जो ट्रेलर आहे तो भलताच भयानक आहे. तो प्रेक्षकांना आणखी आश्चर्यचकित करतो. धक्का देतो. त्यामुळे द एक्झॉर्सिटच्या ट्रेलरनं सध्या वेगळ्याच चर्चेला सुरुवात केली आहे. पुढील महिन्यात सहा ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत असून तो पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

एक्झॉर्सिटमध्ये अकादमी पुरस्कार प्राप्त अभिनेत्री एलेन बर्स्टिन, जेनिफर नेटल्स आणि ऐन डाऊड मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. त्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT