sharad kelkar and priyamani 
मनोरंजन

The Family Man 2: 'लोनावला में क्या हुआ था?'; निर्मात्यांनी का ठेवलं गूढ कायम?

निर्माते राज आणि डीके यांनी दिलं उत्तर

स्वाती वेमूल

'द फॅमिली मॅन' The Family Man 2 या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वेब सीरिजचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सध्या सोशल मीडियावर त्याचीच जोरदार चर्चा आहे. पहिल्या सिझननंतर 'लोणावळ्यामध्ये काय झालं' या रहस्याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र ती उत्सुकता दुसऱ्या सिझनमध्येही ताणून ठेवली. 'लोणावळा मे क्या हुआ था', याचं उत्तर प्रेक्षकांना का दिलं नाही, हे आता सीरिजचे निर्माते राज निदिमोरु आणि कृष्णा डीके Raj and DK यांनी समजावून सांगितलं आहे. (The Family Man 2 creators Raj and DK explain why they did not answer Lonavala mein kya hua tha)

सीरिजमधील श्रीकांत तिवारीच्या (मनोज वाजपेयी) पात्रासोबतच प्रेक्षकांनी ते शोधून काढलं पाहिजे, असं निर्माते म्हणाले. श्रीकांतची पत्नी सुची ही पहिल्या सिझनमध्ये एका बिझनेस ट्रिपला जाते. या ट्रिपदरम्यान ती आणि सहकारी अरविंद यांच्यात जवळीक निर्माण होऊन सुची श्रीकांतची फसवणूक करते, असं सूचित कथानक प्रेक्षकांना दाखवण्यात आलं आहे. लोणावळ्यात नेमकं काय घडलं, हे दुसऱ्या सिझनमध्येही स्पष्ट होत नाही. 'लोणावळ्यात काय घडलं हे जोपर्यंत श्रीकांतला कळत नाही, तोपर्यंत त्याच्या चिंतेत भर पडत नाही', असं मनोज वाजपेयी म्हणत पुढील उत्तर निर्मात्यांना देण्यास सांगितलं. त्यावर डीके म्हणाले, 'जेव्हा श्रीकांतला सत्य समजेल, तेव्हाच प्रेक्षकांना कळू दे असं आम्हाला वाटत होतं. जे श्रीकांतला माहित नाही, ते प्रेक्षकांनाही कळू द्यायचं नव्हतं. जर त्याला संशय येत असेल तर तो संशय प्रेक्षकांनाही आला पाहिजे आणि जर त्याचा गैरसमज होत असेल तर प्रेक्षकांचाही गैरसमज होऊ दे, असा आमचा विचार होता. श्रीकांतच्या आधीच प्रेक्षकांना सत्य समजणं चुकीचं ठरेल.'

लोणावळ्यातील घटनेमुळे प्रेक्षकांमध्ये इतकी उत्सुकता निर्माण होईल याची अपेक्षा आम्हीसुद्धा केली नव्हती, असं राज म्हणाले. 'कथानकातील त्या वळणाबद्दल एक वेगळीच उत्सुकता आहे. त्याचं उत्तर आम्ही न देणंच योग्य आहे. यासाठी आमच्यावर टीका होईल याचीही कल्पना आम्हाला होती', असं ते पुढे म्हणाले.

'द फॅमिली मॅन २' ही सीरिज ४ जून रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली. आता या सीरिजच्या तिसऱ्या सिझनचीही चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update : कुर्ल्यात इमारतीच्या पाचव्या माळ्याला आग

Kolhapur News: ‘डीपी प्लॅन’, रिंगरोडला मिळेना मुहूर्त; गुंठेवारी नियमिती करणाचे घोंगडे अजूनही भिजतच

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

SCROLL FOR NEXT