Priyamani 
मनोरंजन

'तू डुकरासारखी दिसतेस'; प्रियामणीने सांगितला बॉडी शेमिंगचा धक्कादायक अनुभव

रंगावरूनही अनेकांनी केली टीका

स्वाती वेमूल

'द फॅमिली मॅन'च्या The Family Man दोन्ही सिझनमध्ये सुचीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियामणीने Priyamani तिला आलेल्या बॉडी शेमिंगच्या धक्कादायक अनुभवाबद्दल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. स्थूलपणावरून आणि वर्णावरून अनेकांनी तिला चिडवल्याचं प्रियामणीने सांगितलं. सोशल मीडियावरील फोटोंवर नेटकऱ्यांनी सावळ्या रंगावरून वाईट कमेंट्स केल्याचंही ती म्हणाली. 'द फॅमिली मॅन'च्या दोन्ही सिझनमध्ये प्रियामणीने दमदार काम केलं. अभिनेता मनोज वाजपेयीने साकारलेल्या श्रीकांत तिवारीच्या पत्नीच्या भूमिकेत ती दिसली. (The Family Man actress Priyamani says people body shamed her told her you are fat looking like a pig)

"अनेकांनी माझ्यावर स्थूलपणावरून टीका केली. तू किती जाड दिसतेस, असं ते म्हणायचे. आता तेच लोक मला म्हणतात, अरे तू बारिक का झालीस? जाड होतीस तेव्हाच छान दिसायची. लोकांना मी नेमकी कशी आवडते, हे माझं मलाच कळेनासं झालंय. तू डुकरासारखी जाड झालीस, अशा शब्दांत मला हिणवलं गेलं. बॉडी शेमिंग करून लोकांना काय मिळतं", असा सवाल प्रियामणीने केला.

शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्स्प्रेस' चित्रपटातील 'वन टू थ्री फोर.. गेट ऑन द डान्स फ्लोअर' या आयटम साँगवर प्रियामणीने डान्स केला होता. त्यावेळीसुद्धा रंगावरून अनेकांनी टीका केल्याचं तिने सांगितलं. "मी काळी दिसते, असं लोक म्हणायचे. पण काळा रंगसुद्धा सुंदर असतो. श्रीकृष्णसुद्धा सावळाच होता. ट्रोल करणाऱ्यांनी त्यांच्या मनातील नकारात्मकता त्यांच्याकडेच ठेवावी. मिनिटभराच्या प्रसिद्धीसाठी इतरांवर टीका करू नये", असा सल्ला तिने ट्रोलर्सना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fadnavis: मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवून माओवादी नेता भूपती शरण येणार? ६० सहकाऱ्यांसह शरणागती, १० कोटींचं होतं बक्षीस

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

PMC Election : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर; ६ नोव्हेंबरला प्रारूप तर १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार

Ajinkya Rahane: 5-6 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या खेळाडूंनी निवड समितीत असावं, नाहीतर...; रहाणेचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT