The Great Indian Family and Sukhee Box Office Collection Day 1 Esakal
मनोरंजन

BO Collection: शाहरुखच्या 'जवान'पुढे विकी अन् शिल्पाच्या चित्रपटाचं खातंही खुलेना! पहिल्या दिवशी फक्त...

The Great Indian Family and Sukhee Box Office Collection Day 1: 'द ग्रेट इंडियन फॅमिली' अन् 'सुखी'चीही अवस्था वाईट

Vaishali Patil

The Great Indian Family and Sukhee BO Collection: गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानचा जवान चित्रपट राज्य करत आहे. या चित्रपटाला रिलिज होऊन बरेच दिवस झाले असले तरी या चित्रपटाची कमाई सुरुच आहे. जगभरात या चित्रपटाच्या कामाईचा आकडा 938 कोटींच्या पुढे गेला आहे तर भारतात या चित्रपटाने 632.25 कोटींची कमाई केली आहे.

जवान चित्रपटाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केल्यामुळे आता इतक्या दिवसानंतर बॉक्स ऑफिसवर दोन सिनेमांनी धडक दिली आहे. या आठवड्यात 'द ग्रेट इंडियन फॅमिली' आणि 'सुखी' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर एंट्री मारली आहे. मात्र पहिल्याच दिवशी या चित्रपटांची कमाई खुपच निराशाजनक आहे.

अभिनेता विकी कौशलने जरा हटके जरा बचके चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं.तो आपल्या अभिनयाने विनोदी भूमिका असो किंवा गंभीर भूमिका प्रत्येक भूमिका उत्तमरित्या पार पाडतो. आता विकी द ग्रेट इंडियन फॅमिली या चित्रपटाद्वारे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला.

या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर विकीने या चित्रपटाद्वारे एक संदेश दिला आहे. मात्र प्रेक्षकांना हा चित्रपट काही खास आवडला नसल्याचं दिसत आहे. शाहरुख खानच्या जवानासमोर विकीचा चित्रपट काही खास कमाल करू शकलेला नाही. द ग्रेट इंडियन फॅमिली च्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे.

विकी कौशल आणि मानुषी छिल्लर यांच्या प्रमुख भुमिका असलेल्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या चित्रपटाने Sacknilk नुसार, शुक्रवारी फक्त 1.40 कोटींची कमाई केली आहे. मात्र वीकेंडला या चित्रपटाच्या कमाई वाढेल अशी आशा व्यक्त केला जात आहे.

द ग्रेट इंडियन फॅमिलीचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत मानुषी छिल्लर, कुमुद मिश्रा, मनोज पाहवा आणि यशपाल शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

तर शिल्पा शेट्टीच्या 'सुखी' या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर मोठया ब्रेकनंतर शिल्पा मोठ्या पडद्यावर परतली मात्र तिच्या चित्रपटाने काही खास कमाल केलेली नाही. Sacknilk च्या मते, 'सुखी'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी केवळ 30 लाख रुपयांचीच कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale: राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बरोबरच: मंत्री भरत गोगावले; माढा तालुक्यातील फळबागांची केली पाहणी!

Dilip Walse Patil: आंबेगाव तालुक्यातील ५ हजार ५८१ खाती कर्जमाफीसाठी पोर्टलवर अपलोड: दिलीप वळसे पाटील; उर्वरित खाती तातडीने अपलोड करा!

FDA Supplement Alert: खळबळजनक! Amazon वरून खरेदी केलेल्या गोळ्यांमध्ये आढळलं विष; वापर थांबवण्याचं आवाहन

रोहित शर्माने पूर्ण केलं संजू राठोडचं स्वप्न, 'हिटमॅन'सोबतचा व्हिडिओ शेअर करत म्हणाला...'लहानपणीचं स्वप्न...' Viral Video

Akola News : अकोल्यात 'ऑपरेशन टायगर' फत्ते; पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे- माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया

SCROLL FOR NEXT