The Indrani Mukherjea Story news esakal
मनोरंजन

The Indrani Mukerjea Story Review: असा 'डॉक्युड्रामा' यापूर्वी कधीही पाहिला नसेल, वेगवेगळी 'रहस्यं' तुम्हाला देतील धक्का!

The Indrani Mukerjea Story The Buried Truth Review नावाच्या माहितीपटानं आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

युगंधर ताजणे

The Indrani Mukerjea Story The Buried Truth Review : सीबीआय इंद्राणी मुखर्जीनं लिहिलेल्या पुस्तकावर आधारित माहितीपटाच्या विरोधात विशेष न्यायालयात गेले होते. तिथं त्यांना दिलासा मिळाला नव्हता. म्हणून त्यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. तिथंही त्यांची मागणी फेटाळली. आणि आता इंद्राणी मुखर्जी स्टोरी नावाच्या माहितीपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला.

आता इंद्राणी मुखर्जी स्टोरी द बरीड ट्रुथ नावाची मालिका प्रदर्शित झाली (The Indrani Mukerjea Story The Buried Truth latest review) असून त्याच्या रिव्ह्यू समोर आले आहेत. हा डॉक्यु ड्रामा पाहून नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही चर्चेत आहेत. एका वेगळ्या विषयांवर आधारित या माहितपटानं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. स्वताच्या मुलीच्या हत्येच्या आरोपावरुन इंद्राणीला तुरुंगात जावे लागले होते. ती सध्या जामिनावर बाहेर असून तिच्याच एका पुस्तकावर आधारित ही मालिका असल्याचे सांगण्यात येते.

शीना बोराचं हत्याकांड आणि त्यानंतर झालेली मीडिया ट्रायल, आरोप - (Sheena Bora Case) प्रत्यारोप तसेच सीबीआयचा तपास या सगळ्यावर हा माहितीपट अनेक प्रश्न प्रेक्षकांसमोर उभे करतो. इंद्राणीवर झालेले आरोप आणि त्याच्याशी संबंधित वेगवेगळे पैलु यावेळी माहितीपटातून समोर आले आहेत. २०१५ मध्ये एका घटनेनं साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला होता.

एका तरुण मुलीची हत्या करण्यात आली होती. त्यात तिच्या आईला संशयित प्रमुख आरोपी म्हणून अटक केली गेली. ही एक हायप्रोफाईल केस होती. त्यामुळे त्याची प्रमाणापेक्षा जास्तच चर्चा मीडियामध्ये होती. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भही जोडण्यात आले होते.

माहितीपटात काय सांगण्यात आले आहे?

त्या माहितीपटात शीना बोरा केसच्या वेगवेगळ्या अँगलवर चर्चा करण्यात आली आहे. माहितीपटाची सुरुवात इंद्राणी मुखर्जी आणि शीना बोरा यांच्या फोटोपासून होते. असं म्हटलं जातं की, शीना ही इंद्राणीची छोटी बहिण होती. पुढे आपल्यासमोर अशा काही गोष्टी येतात की, शीना ही इंद्राणीची मुलगी असल्याचे कळते.

केवळ चार एपिसोडची ही मालिका प्रेक्षकांना वेगळ्याच माहोलमध्ये घेऊन जाणारी आहे. त्यात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. सीरिजमध्ये इंद्राणीची मुलगी विधी, तिचा मुलगा मिखाईल तिचे दुसरे पती संजी खन्ना, त्यांचे मित्र पत्रकार विद्या, सीनिअर पत्रकार राजदीप सरदेसाई, निवृत्त पोलीस अघिकारी वाय पी सिंह, इंद्राणीचे वकील रंजीत सांगळे आणि इंद्राणीनं संवाद साधला आहे.

वरकरणी आपल्याला ही स्टोरी अतिशय साधीशी वाटू लागते. मात्र आपण जेव्हा हा माहितीपट पाहू लागतो तेव्हा त्यातील अनेक मुद्दे आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. या सगळ्यात मेकर्सनं कमाल केली आहे. उराज बहाल आणि सहाना लेवी यांनी या माहितीपटाची निर्मिती केली आहे. आपल्या समोर एका वेगळ्या सिक्रेटचा खुलासा या माहितीपटाच्या निमित्तानं होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT