Kapil Sharma Esakal
मनोरंजन

Kapil Sharma: द कपिल शर्मा शो फेम तीर्थानंद रावने फेसबुक लाइव्ह करत केला आत्महत्येचा प्रयत्न, कारण...

ज्यूनिअर नाना पाटेकर म्हणून ओळख असलेल्या कॉमेडियन तीर्थानंद राव याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

अंकिता खाणे (Ankita Khane)

द कपिल शर्मा शो फेम तीर्थानंद रावने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यूनिअर नाना पाटेकर म्हणून ओळख त्याची ओळख आहे. तीर्थानंद रावने फेसबुकवर लाइव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला एक महिला ब्लॅकमेल करत असल्याचा दावा करत तीर्थानंद रावने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सुदैवाने तीर्थानंद यामधून बचावला आहे. यापूर्वीही त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. (Latest Marathi News)

तीर्थानंद राव याने दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये त्याने एक महिला आपल्याला कशा प्रकारे भेटली. त्यांची ओळख कशी झाली. तिने आपल्याला फसवल्याचं त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.(Marathi Tajya Batmya)

माझ्या आजच्या परिस्थितीला ही महिला जबाबदार आहे. माझ्या आयुष्याचं काही बरं वाईट झालं तर मला न्याय मिळाला पाहिजे, असं तीर्थानंद राव याने आत्महत्या करताना फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलं आहे. तीर्थानंद राव हा या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता.(Latest Marathi News)

या महिलेला दोन मुली आहेत. या महिलेने आपल्याला इमोशनली ब्लॅकमेल केलं. या महिलेने आपल्याकडून पैसे घेतल्याचा त्याने दावा केला आहे. ही महिला लग्नाचा तगादा लावत आहे. तिने माझ्यावर हात उचलला. तर त्या महिलेचे नावही त्याने लाईव्हमध्ये सांगितले आहे. तर ती महिला लग्नासाठी ब्लॅकमेल करत आहे. त्यामुळे मी फिनाइल घेऊन आयुष्य संपवत असल्याचं तीर्थानंद रावने म्हटलं आहे.(Marathi Tajya Batmya)

तीर्थानंदच्या या फेसबुक लाइव्हची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी त्याच्या घरी धाव घेतली. यावेळी तो बेशुद्ध पडलेला होता. पोलिसांनी त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर डॉक्टर उपचार करत असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात आलं आहे. पोलीस वेळेत पोहोचल्यामुळे त्याच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT