The kapil Sharma Show New Promo viral,Season 4 Google
मनोरंजन

वैवाहिक आयुष्याला कंटाळला कपिल शर्मा? शो च्या नवीन प्रोमोतून हैराण करणारं विधान

'द कपिल शर्मा' शो १० सप्टेंबरपासून छोट्या पडद्यावर भेटीस येत आहे. पण त्याआधीच शो च्या प्रोमोनं मनोंरजन करतानाच खळबळ उडवून दिलीय.

प्रणाली मोरे

The Kapil Sharma Showe: द कपिल शर्मा शो च्या चाहत्यांची प्रतिक्षा आता लवकरच संपतेय. १० सप्टेंबर रोजी 'द कपिल शर्मा शो' सिझन ४ छोट्या पडद्यावर आपल्या भेटीस येत आहे. नवी टीम अन् सोबत नवा जोश घेऊन कपिल शर्मा(Kapil Sharma) पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. शो संबंधित जेवढे प्रोमो आतापर्यंत समोर आले आहेत त्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. सगळ्यात मजेदार प्रोमो तर कपिल आणि त्याची ऑनस्क्रीन पत्नी सुमोना चक्रवर्ती यांच्यातील तू-तू,मै-मै वर आधारित आहे.(The kapil Sharma Show New Promo viral,Season 4)

सोनी टि.व्हीनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कपिल आणि सुमोना यांच्यातील मजेदार तू-तू,मै-मै वालं भांडण प्रोमोच्या माध्यमातून शेअर केलं आहे. हा व्हिडीओ भलताच एंटरटेनिंग आहे. यामध्ये सगळ्यांचे लाडके कप्पू शर्मा यांना त्यांची पत्नी बिंदू आहे हे आठवून देण्याचा भरपूर प्रयत्न होताना दिसत आहे. पण कप्पू शर्मांना मात्र पत्नीशी संबंधित कुठल्याच गोष्टींचं स्मरण करायचेच नाही आहे. कप्पू शर्माचे सासू-सासरे आपल्या जावयाला मुलीचं स्मरण करुन देताना हर त-हेचे प्रयत्न करताना दिसत आहेत. पण कप्पू मात्र असं काही आठवायला तयारच नाही. किंबहुना त्याला त्यात इंटरेस्टच नाही असं दाखवलं गेलं आहे.

प्रोमोमध्ये सुमोना कपिलला म्हणताना दिसते आहे की,'आपलं लग्न दोन वर्षांपूर्वी झालं आहे शर्माजी'. तेव्हा कपिल म्हणतो,'लॉकडाऊनमध्ये जे झालं ते झालं, ते सगळं कॅन्सल. ते मला मान्य नाही'. हे कपिलचं उत्तर ऐकून सुमोनाला शॉकच बसताना दिसतो. त्यानंतर कपिलचे सासरे त्याला सगळं आठवून द्यायचा प्रयत्न करताना दिसतात. ते कपिलला आपली बोटं दाखवून विचारतात,'किती आहे हा आकडा?' कपिल त्याचं उत्तर बरोबर देतो. पण जेव्हा बायकोविषयी काही विचारलं जातं तेव्हा मात्र म्हणताना दिसतो-'माहित नाही'. तो चक्क म्हणतो,'ही नको मला, आणखी चांगली असेल इतर कुणी तर दाखवा'. तेव्हा कपिलची सासू म्हणते-'तुम्हाला आठवतं का जेव्हा तुम्ही आमच्या घराच्या गेटवर वरात घेऊन आला होतात तेव्हा तुमची आरती ११ जणींनी केली होती'. तेव्हा कपिल म्हणतो- 'हो,त्यातील १ मुलगी होती बाकी १० मुलांना तुम्ही साडी नेसवून उभं केलं होतं'.

तेव्हा सुमोना म्हणताना दिसते -'तु माझ्या भांगेत तुझ्या नावाचं सिंदुर लावलं होतंस'. हे ऐकून कपिल एकदम जोरात ओरडतो आणि म्हणताना दिसतो-'ते तर मला मुळीच आठवत नाही'. या संपूर्ण सीनला शो मध्ये उपस्थित प्रेक्षकवर्ग आणि जजच्या खूर्चीत बसलेल्या अर्चना पुराण सिंग यांनी देखील खूप एन्जॉय केल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

यावेळी शो मध्ये कृष्णा अभिषेक आणि भारती सिंग दिसणार नाहीत. त्यामुळे त्यांचे चाहते निराश होणार हे निश्चित .पण कपिलनं चाहत्यांच्या मनोरंजनाची पूर्ण जबाबदारी चांगली पेलल्याचं प्रोमोमधून दिसत आहे. ५ नवीन चेहरे यंदाच्या सिझनमध्ये दिसणार आहेत.आता १० सप्टेंबरला कळेलच की कपिल शर्माचं हे नवीन विनोदी कुटुंब प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात किती यशस्वी ठरते ते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

SCROLL FOR NEXT