The Kapil sharma Show
The Kapil sharma Show Google
मनोरंजन

The Kapil Sharma Show ला आणखी एक मोठा झटका; कृष्णा नंतर 'हा' प्रसिद्ध कॉमेडियनही बाहेर पडण्याच्या तयारीत

प्रणाली मोरे

The Kapil Sharma Show : गेल्या सात वर्षांपासून कॉमेडीच्या माध्यमातून लोकांचे मनसोक्त मनोरंजन करणारा 'द कपिल शर्मा शो' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात शो नं नव्या सिझनसोबत कमबॅक केलं होतं.

त्यावेळी कृष्णा अभिषेकीनं कमी पैसे ऑफर केले गेले म्हणून शो सोडला होता. त्यानंतर चंदन प्रभाकर देखील शो मधून बाहेर पडला कारण त्याला सिनेमा मिळाला. आता आणखी एक कॉमेडियन शो ला सोडून गेल्याचं वृत्त समोर आलं आहे.

सिद्धार्थ सागरनं कपिल शर्माचा शो सोडण्याचा निर्णय घेतल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आहे.(The Kapil Sharma show sidharth sagar quit the show)

समोर आलेल्या बातमीनुसार कळत आहे की, सिद्धार्थ सागरला जे मानधन दिलं जातं त्यावरनं त्याचे निर्मात्यांसोबत काही खटके उडाले आहेत. सिद्धार्थला त्याचं मानधन वाढवून हवं होतं. पण निर्माते यासाठी तयार नव्हते. या कारणानं सिद्धार्थनं शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सिद्धार्थ द कपिल शर्मा शो च्या शूटिंग निमित्तानं खरंतर मुंबईला शिफ्ट झाला होता. पण आता तो त्याच्या घरी म्हणजे दिल्लीला परतल्याचं कळत आहे.

शो मध्ये आता सिद्धार्थ परत येण्याची आशा खूपच कमी असल्याचं बोललं जात आहे. सिद्धार्थ शो मध्ये वेगवेगळ्या कॅरेक्टर्सच्या माध्यमातून दिसायचा. कधी तो 'सेल्फी मौसी' तर कधी 'उस्ताद घरछोडदास' तर कधी 'फनवीर सिंग' बनून शो ला मजेदार करण्यात महत्त्वाचा वाटा उचलायचा.

सिद्धार्थशी यासंदर्भात जाणून घेण्यासाठी जेव्हा संपर्क साधला गेला तेव्हा त्यानं सुरुवातीला यावर काहीही बोलण्यास नकार दिला. पण नंतर जाऊन म्हणाला की, ''असं काहीच नाही. मी यासंदर्भात अधिक काही बोलू शकत नाही. माझं निर्मात्यांशी बोलणं सुरू आहे''.

याआधी एका पत्रकार परिषदेत कृष्णा अभिषेकीने म्हटलं होतं की, ''कपिल आणि मी लवकरच एकत्र येऊन काहीतरी नवं करायची योजना आखत आहोत. आमच्यामध्ये कोणतेच मतभेद नाहीत. गेल्या काही काळापासून आम्ही एकत्र येण्याचा विचार करत आहोत''

. बोललं जात आहे की 'द कपिल शर्मा शो' च्या या सिझनमध्ये किंवा पुढील सिझनमध्ये कृष्णा कमबॅक करू शकतो.

हा शो २०१६ साली लॉंच झाला होता. आणि तेव्हापासून भारतीय टेलीव्हिजनवर या शो नं धुमाकूळ घातलेला आपण पाहिला. या शो मध्ये कपिल शर्मा व्यतिरिक्त सुमोना चक्रवर्ती,कीकू शारदा,राजीव ठाकूर सारखे चेहरे आता सध्या आपल्याला दिसत आहेत.

आतापर्यंत अनेक विनोदवीरांनी या शो मधून एक्झिट घेतल्याचं आपण पाहिलं आहे. कृष्णा अभिषेकी,चंदन प्रभाकर सोबत भारती सिंग,सुनील ग्राव्हर, अली असगर आणि उपासना सिंग अशा अनेक बड्या कलाकारांनी शो ला बाय-बाय म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; बेंगळुरू-चेन्नई संघात मोठे बदल; जाणून घ्या प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

SCROLL FOR NEXT