The Kapil sharma Show Esakal
मनोरंजन

Kapil Sharma Show : कपिलच्या शोला पुन्हा ग्रहण? या दिवशी येईल शेवटचा एपिसोड..

Vaishali Patil

'द कपिल शर्मा शो' छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कॉमेडी शो आहे, या शो चे जगभरात तगडे फॅनफॉलॉइंग आहेत. हा शो ना केवळ प्रेक्षकांना खळखळवून हसवतो तर या शो ने अनेक कलाकारांचं करिअर घडवण्यासही मदत केली आहे.

कपिल शर्मासोबत बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंतचे बडे स्टार्स प्रत्येक एपिसोडमध्ये सहभागी असतात. कपिल शर्मा शोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ती म्हणजे 'द कपिल शर्मा शो' बंद होणार आहे.

रिपोर्टनुसार, कपिल शर्माला आता विश्रांती घ्यायची आहे. त्यामुळेच हा शो तात्पुरता बंद करण्याचा विचार सुरू आहे.

सूत्रांनी सांगितले की,शोच्या टीआरपीच्या दृष्टीने प्रत्येक वेळी हंगामी ब्रेक हा चांगली बाब आहे. जेणेकरून ते शो मध्ये काहीतरी नवीन प्रयोग करु शकतात.

शो सतत चालवल्यामुळे शो कंटाळवाण होण्याची शक्यता देखील वाढते. म्हणूनच ब्रेक घेणे हा एक चांगला प्रयोग आहे.असं म्हणत शो चे निर्माते हा शो बंद करण्याचा निर्णय घेत आहेत

द कपिल शर्मा शोचा पहिला एपिसोड 23 एप्रिल 2016 रोजी सुरू झाला होता, त्यानंतर कपिल शर्मा त्याच्या इतर सहकाऱ्यांसोबत आतापर्यंत चार सीझनमधून लोकांना हसवत आहेत

असं म्हटलं जात आहे की मेकर्स जूनपर्यंत शोला चालवण्याचा विचार करत आहेत. असे म्हटले जात आहे की जर निर्मात्यांनी असे केले तर वर्षाच्या मध्यापर्यंत शो बंद होईल.

'द कपिल शर्मा शो' बंद होण्याचं दुसर एक कारण म्हणजे कपिल शर्माकडे पुढे आंतरराष्ट्रीय टूर लाइन-अप आहेत. त्याचं शेड्युल खूप व्यस्त आहे. अशा परिस्थितीत त्यालाही विश्रांतीची गरज असल्याने जेणेकरून तो त्याच्या इतर वचनबद्धतेची पूर्तता करू शकेल. 'द कपिल शर्मा शो'चा नवा सीझन कधी येईल हे सध्या तरी माहीत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT