Comedian Teerthanand  
मनोरंजन

'द कपिल शर्मा शो'मध्ये काम केलेल्या कॉमेडियनने घेतलं विष

नाना पाटेकरांचा 'डुप्लिकेट' म्हणून ओळख

स्वाती वेमूल

मुंबई वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा लॉकडाउनची भीती सतावतेय. यामुळे कलाविश्वातील कित्येक ज्युनिअर आर्टिस्ट आणि निर्माते चिंतेत आहे. दोन वर्षांनंतर आता कुठे परिस्थिती सुधारेल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा त्यांच्यावर लॉकडाउनची टांगती तलवार आहे. याच ताणामुळे एका अभिनेत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. कलाविश्वात गेल्या पंधरा वर्षांपासून सक्रीय असणारा अभिनेता तीर्थानंद (Teerthanand) याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. २७ डिसेंबरच्या संध्याकाळी ही घटना घडली. सुदैवाने त्याच्या शेजाऱ्यांना याविषयी वेळीच समजल्याने त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं आणि तीर्थानंदचे प्राण वाचले. चार दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर तीर्थानंदला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तीर्थानंद हा हुबेहूब नाना पाटेकरांची नक्कल करायचा. त्याने 'द कपिल शर्मा शो'मध्येही काम केलं होतं.

आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक समस्यांमुळे घेतलं विष

एका वृत्तवाहिनीशी बोलताना तीर्थानंद म्हणाला, 'आधीच आर्थिक समस्या असताना कुटुंबीयांनीही माझी साथ सोडली. मी रुग्णालयात असतानाही आई किंवा भाऊ मला भेटायला आले नव्हते. आम्ही एकाच कॉम्प्लेक्समध्ये राहतो. माझे कुटुंबीय माझ्याशी बोलत नाहीत. माझ्यावर कर्जाचं ओझं आहे. जिच्यासोबत लग्न केलं, तिने पळून दुसऱ्याशी लग्न केलं. माझ्या मुलीसोबतही माझा संपर्क नाही '

'माझ्या कामाने मला ओळख आणि पैसा दिला. मात्र आता पुन्हा मी हिरोवरून झिरो झालो आहे. जवळपास आठ विविध भाषांमध्ये मी काम केलंय. नाना पाटेकर यांसारखा हुबेहूब दिसणारा म्हणून मला ओळखायचे. मी त्यांची नक्कल करायचो. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे माझी परिस्थिती खूप वाईट झाली आहे. जी काही कामं मिळत होती, त्याचेही पैसे रखडले आहे', अशा शब्दांत तीर्थानंदने दु:ख व्यक्त केलं. तीर्थानंदने २०१६ मध्ये कपिल शर्माच्या शोमध्ये काम केलं होतं. 'कॉमेडी सर्कस'मध्येही त्याने भाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT