Bhasha Sumbli (The Kashmir Files Actress) Google
मनोरंजन

The Kashmir Files: सिनेमाचा क्लायमॅक्स शूट होताना ढसाढसा रडली अभिनेत्री

'द काश्मिर फाईल्स' सिनेमात काही दृश्य हैराण करतात तर काही दृश्य मनाला छिन्न-विछिन्न करून सोडतात.

प्रणाली मोरे

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या 'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir Files) या सिनेमाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. या सिनेमातलं सत्य पाहून कुणाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या असतील तर सत्याचं खरं रुप पाहून रागाचा पारा चढलाही असेल तर कुणाच्या मनात भावनांचा कल्लोळही माजला असेल. 'द काश्मिर फाईल्स' सिनेमात काही दृश्य हैराण करतात तर काही दृश्य पाहताना त्रासही होतो. प्रेक्षक मात्र सिनेमाच्या क्लायमॅक्सवर चर्चा करताना अधिक दिसत आहेत. हा क्लायमॅक्स मन विषण्ण करुन सोडतो. अभिनेत्री भाषा सुंबली(Bhasha Sumbli) वर हा क्लायमॅक्स(Climax Scene) चित्रित केला गेला आहे.

सत्य खरंतर या सीनपेक्षा अधिक विदारक आहे. पण तितकं अंगावर येणारं सत्य दाखवून प्रेक्षकांना अधिक त्रास होऊ नये यासाठी दिग्दर्शकानं केवळ आपल्या सिनेमॅटिक लिबर्टिचा उपयोग त्या सीन साठी केलेला आहे. या सीनमध्ये दहशतवाद्यांकडून भाषा सुंबलीनं जे पात्र रंगवलं आहे शारदा त्या व्यक्तिरेखेचे कपडे फाडण्यात येतात. सत्य यापेक्षा भयानक आहे. या सीनला चित्रित करताना अभिनेत्री भाषा सुंबलीच नाही तर टीममधील अनेकांना अश्रू आवरले नाहीत.

याविषयी अभिनेता चिन्मय मांडलेकरनं (Chinmay Mandlekar) ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत उल्लेख केला आहे. तो म्हणाला,''या क्लायमॅक्सच्या सीनमध्ये बिट्टा(दहशतवादी) शारदा या व्यक्तिरेखेचे कपडे फाडतो. पण तो सीन करणं आमच्या सगळ्यांसाठीच कठीण होतं. भाषा तर ढसाढसा रडत होती. त्यावेळी सगळ्यांच्या ज्या भावना होत्या त्या खऱ्या होत्या. कारण अशा परिस्थितीतून जो प्रत्यक्षात गेला असेल त्याचं काय झालं असेल याचा विचार करणंच कठीण होतं असंही चिन्मयनं नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT