Vivek Agnihotri( The Kashmir File's Director) Google
मनोरंजन

'भारतातील 2 मोठी सत्य जगासमोर येतील'; काश्मिर फाईल्सच्या दिग्दर्शकाची घोषणा

'द काश्मिर फाईल्स'च्या टीमसोबतच आपण आणखी दोन सिनेमे काढणार आहोत अशी घोषणा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केली आहे.

प्रणाली मोरे

गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला द काश्मिर फाईल्स (The Kashmir Files)अजूनही चर्चेत आहे. विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) दिग्दर्शित या सिनेमानं अपेक्षा नसतानाही जे मोठं यश मिळवलं आहे त्यापुढे भल्याभल्या बड्या सिनेमांनी नांगी टाकलेली आपण पाहिली असेल. आता द काश्मिर फाईल्सचे निर्माता-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी याच सिनेमाच्या टीमसोबत आपण दोन नवीन सिनेमे करणार आहोत अशी मोठी घोषणा केली आहे. द काश्मिर फाईल्सचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमत्तानं विवेक अग्निहोत्री यांनी आगामी दोन सिनेमांची घोषणा केली आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी या सिनेमाची घोषणा करताना एक व्हिडीओ पोस्ट केला आहे,ज्या माध्यमातून त्यांनी पूर्ण माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे,''द काश्मिऱ फाईल्स सिनेमाच्या टीमसोबत मी पुन्हा काम करणार आहे. एक नाही तर चक्क दोन सिनेमे घेऊन आमची तिच टीम पुन्हा आपल्या भेटीस येईल''. मात्र विवेक अग्निहोत्री यांनी या व्हिडीओत सिनेमाच्या नावांविषयी काहीही सांगितलेलं नाही. पण हे दोन्ही सिनेमा भारतातील सत्य घटनांवर आधारित असतील हे मात्र सुचित केलं आहे. या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर शेअर करताना विवेक अग्निहोत्री यांनी द काश्मिर फाईल्सचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ''टायगर प्रोड्युसर अभिषेक अग्रवाल जन्मदिन की बहुत-बहुत बधाई एवं शुभकामनाएं'' अशा हिंदी भाषेत शुभेच्छा दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील प्रथितयश संस्थेनं द काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा सिनेमाच्या यशासाठी प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला होता. द काश्मिर फाईल्स सिनेमात काश्मिरमध्ये ९० साली काश्मिरी पंडितांसोबत झालेल्या अत्याचारावर भाष्य करण्यात आलं आहे. या सिनेमात अनुपम खेर,पल्लवी जोशी,चिन्मय मांडलेकर,दर्शन कुमार मिथुन चक्रवर्ती अशा कलाकारांनी काम केलं आहे. ११ मार्च,२०२२ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमानं बॉक्सऑफिसवरचे आतापर्यंतंचे अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. तब्बल २५० करोडहून अधिक कमाई या सिनेमानं आतापर्यंत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking : रोहित शर्मा पंजाब किंग्सविरुद्धचा सामना नाही खेळणार! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, माघारीचं कारण अस्पष्ट; सलामीला कोण?

CBSE Class 10 Result 2026 OUT! तुमचा 10वीचा निकाल कसा पाहायचा? स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत जाणून घ्या

"त्यावेळी मला खूप त्रास झाला" मुलाच्या नावाच्या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी अखेर व्यक्त;"तुम्हाला अधिकार नाही"

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

SCROLL FOR NEXT