the kashmir files fame vivek agnihotri slams filmfare awards 2024  SAKAL
मनोरंजन

Vivek Agnihotri on Filmfare: "विकलेल्या पुरस्कार सोहळ्यात तुम्ही..." विवेक अग्निहोत्रींची फिल्मफेअर पुरस्कारांवर टिका

Filmfare Awards 2024: विवेक अग्निहोत्रींनी फिल्मफेअर पुरस्कारांवर टीका केली आहे

Devendra Jadhav

Vivek Agnihotri on Filmfare Awards: २७, २८ जानेवारीला रात्री गुजरातच्या गांधीनगरमध्ये फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा झाली. या रंगारंग सोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

रणबीर कपूर, आलिया भट्ट, विक्रांत मस्सेसह शबाना आझमींपर्यंत सगळे कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. अशातच द काश्मिर फाईल्स फेम विवेक अग्निहोत्रींनी फिल्मफेअर पुरस्कारांवर टिकास्त्र सोडलं आहे.

(the kashmir files fame vivek agnihotri slams filmfare awards 2024)

विवेक अग्निहोत्रींची फिल्मफेअर पुरस्कारांवर टीका

विवेक अग्निहोत्रींनी ट्विट केलंय की, "सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट व्यक्तींसह संपूर्ण बॉलीवूडला फिल्मफेअर ॲवॉर्ड्समध्ये सहभाग घेण्यात काही विचित्र वाटत नाही, याचा मला जास्त त्रास होतो. ॲवॉर्ड शोमध्ये डान्स करुन हे कलाकार आपल्या कलेचा आदर करू शकत नाही. याशिवाय हा पुरस्कार सशुल्क पीआरसह दाखवून त्यांना लाज वाटत नाही. हे म्हणजे असं झालं की एखाद्या डेंटिस्टने आपल्या दवाखान्याची जाहिरात करण्यासाठी त्याचेच घाणेरडे दात दाखवले."

फिल्मफेअर 2024 मध्ये रणबीरचा खास डान्स

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रणबीर कपूरने त्याच्या डान्सने सोहळ्याची शान चांगलीच वाढवली. रणबीरने त्याच्या रणविजय अवतारात 'ॲनिमल' मधील मशीनगनची प्रतिकृती चालवली आणि दणक्यात एन्ट्री घेतली.

'ॲनिमल' मधील 'जमालकुडू' या लोकप्रिय गाण्यावर रणबीर डान्स करत होता. अशातच प्रेक्षकांमध्ये बसलेली त्याची पत्नी आलिया भटकडे त्याची नजर गेली. रणबीर स्टेजवरुन खाली आला. आणि त्याने आलियासोबत 'जमालकुडू'ची हुकस्टेप केली. आलियानेही रणबीरला चांगलीच साथ दिली. या दोघांच्या डान्सचं खुप कौतुक होतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ward Structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल?

Uddhav Thackeray : संघटनात्मक बांधणी भक्कम केल्याशिवाय ते जिंकले कसे, आपण हरलो कसे याची उत्तरे मिळणार नाहीत : उद्धव ठाकरे

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Ambad News : अंबड तालुक्यातील लालवाडी तांडा नंबर 1 वर घडली दुर्दैवी घटना; तलावात पाय घसरून अकरा वर्षीय राजवीर राठोड याचा बुडून मृत्यू

Latest Marathi News Live Update: कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी राजश्री राठोड यांचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT