The Kashmir Files Sakal
मनोरंजन

The Kashmir Files: बत्तीस वर्षांपासून दाटलेल्या हुंदक्याला वाट मिळाली

‘द कश्मीर फाईल्स’बद्दल पीडित काश्मिरी नागरिकांची भावना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आमच्याच देशात आम्हाला ३२ वर्षानंतरही स्थलांतरित म्हणून राहण्याची वेळ आली आहे. मानवजातीला काळिमा फासणाऱ्या घटना काश्मीरमध्ये घडल्या, काश्मिरी पंडीतांबरोबरच बौद्ध, सिक्ख, दलित आदी सर्वांचे स्थलांतर १९ जानेवारी १९९० च्या त्या काळरात्री झाले. बत्तीस वर्षे झाले आमच्या दुःखाना व्यासपीठ मिळाले नव्हते. द कश्मीर फाईल्सच्या निमित्ताने आजवर खोलवर दाटलेल्या हुंदक्याला मोकळी वाट झाली आहे, अशी भावना पुण्यात राहणाऱ्या काश्मिरी नागरिकांनी व्यक्त केली.

कश्मीर हिंदू सभेच्या वतीने बंडगार्डन येथील चित्रपट गृहात महाराष्ट्रीयन बांधवांना द कश्मीर फाईल्स हा चित्रपट पाहण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी कश्मिरीसमाजाने विशेष उपस्थिती लावली होती. सभेचे सचिव डॉ. संजय धर म्हणाले,‘‘आजवर आमच्या या दुःखाकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. या चित्रपटाच्या निमित्ताने तथ्यांच्या आधारे काश्मीरच्या स्थलांतरीतांवर झालेल्या अन्यायाला एक व्यासपीठ मिळाले आहे.

या विशेष प्रदर्शनाच्या माध्यमातून नव्या पिढीला आणि मराठी बांधवांना आमची आपबीती दाखविण्याचा प्रयत्न आहे.’’ स्वतःच्याच देशात स्थलांतरित म्हणून जगणे असह्य असल्याचे रोहीत भट यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘हे केवळ कश्मीर पंडितांचे दुःख नाही. तर १९९०मध्ये अनन्वित अत्याचारामुळे ज्यांना स्वतःची जन्मभूमी सोडून पळावे लागले त्या सर्व कश्मीर नागरिकांचे दुःख आहे. अनेकांनी आपले आई-वडील, भाऊ-बहीण, मुलगा-मुलगी यात गमावले आहेत. आम्ही जिवाच्या आकांतापासून ओरडून सांगितलेले सत्य पडद्यावर आले आहे.’’ आम्हाला परत काश्मीरमध्ये आमच्या गावी जायचे आहे, अशी भावना अनेक काश्मिरी नागरिकांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने झाले आणखी स्वस्त, चांदीचीही चमक उतरली, तुमच्या शहरात १० ग्रॅम सोन्याचा आजचा भाव काय? जाणून घ्या

अर्जुन कपूरला त्याच्या चाहत्यांनीच केलं ट्रोल!

Supreme Court: आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही; ‘स्थानिक’बाबत न्यायालयाचे निर्देश

Chandrapur Crime: प्रेमाच्या आड आलेला पती ठार! कोरपना तालुक्यात धक्कादायक हत्या

Dombivli Kalyan Politics:'डोंबिवली कल्याणचा राजकीय पट बदलतोय'; वैर संपतंय, हितगुज वाढतेय; नवी समीकरण जुळतायत..

SCROLL FOR NEXT