The Kashmir Files  सकाळ
मनोरंजन

IFFI 2022": 'काश्मीर फाईल्स' प्रपोगंडा चित्रपट, महोत्सवात आलाच कसा? परीक्षकांची नाराजी

बॉलीवूडमध्ये ज्या चित्रपटानं गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर वेगळ्या वातावरणाची निर्मिती केली.

सकाळ डिजिटल टीम

The Kashmir Files Propoganda movie: बॉलीवूडमध्ये ज्या चित्रपटानं गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर वेगळ्या वातावरणाची निर्मिती केली. केवळ सोशल मीडियावरील मार्केटींग स्टॅट्रजीनं प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यास प्रवृत्त केले. असे ज्या चित्रपटाच्याबाबत म्हटले जाते त्या द काश्मिर फाईल्स या चित्रपटावरील वाद अजुनही थांबलेले नाहीत.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मीर फाईल्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो गोव्याच्या यंदाच्या इफ्फी चित्रपट महोत्सवामध्ये. आज त्या चित्रपट महोत्सवाची सांगता झाली. त्यावेळी परिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यापैकी एका परीक्षकानं बिनधास्तपणे काश्मीर फाईल्स हा प्रचारकी चित्रपट असल्याचे सांगून अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

गोव्यातील इफ्फी चित्रपट महोत्सव हा नेहमीच चर्चेत असणारा महोत्सव आहे. जगभरातून हा महोत्सव पाहण्यासाठी प्रेक्षक येत असतात. अभ्यासकही येतात. अशावेळी जगभरातील सिनेप्रेमींसाठी, रसिकांसाठी हा महोत्सव नेहमीच वेगळ्या पर्वणीचा विषय ठरला आहे. आता तर शेवटच्या दिवशी महोत्सवाचे प्रमुख आयोजक आणि चेअरमन नदाव नफिल यांनी व्यक्त केलेलं मत हे सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

काश्मीर फाईल्स हा चित्रपट इफ्फीच्या महोत्सवात आलाच कसा, तो या महोत्सवामध्ये येणं ही मोठी धक्कादायक बाब आहे. याचे कारण म्हणजे तो एक प्रचारकी चित्रपट आहे. काश्मीर फाईल्स ही प्रपोगंडा फिल्म आहे. असे नदाव यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर नदाव यांच्यावर आता नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : राष्ट्रवादी अन् मविआ पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढणार? अजितदादांचा सतेज पाटील यांना फोन

हृदयद्रावक! भीषण अपघातात मामा-भाचीनंतर सात महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाचाही मृत्यू; कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त

Latest Marathi News Live Update : नगराध्यक्ष होताच हातात झाडू घेऊन मैथिली तांबे उतरल्या थेट संगमनेरच्या रस्त्यावर

Kolhapur Flashback : रिक्षाचालकांचा घेराओ, सभात्याग आणि गुप्त खेळी; १९८० ची महापौर निवडणूक इतिहासजमा

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली ! सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती देण्याचा आदेश

SCROLL FOR NEXT