Chinmay Mandlekar, Balasaheb Thackeray Google
मनोरंजन

बाळासाहेबांविषयी एका काश्मिरी पंडिताने काय सांगितले चिन्मय मांडलेकरला?

'द काश्मिर फाईल्स' सिनेमानिमित्तानं सकाळ पॉडकास्टला दिलेल्या विशेष मुलाखतीत चिन्मय मांडलेकरने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

'द काश्मिर फाईल्स' (The Kashmir FIles)सिनेमाची सध्या भारतात सर्वत्र चर्चा सुरू आहे. तर सिनेमातल्या बिट्टा कराटे व्यक्तीरेखेला पाहून प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलंय. या बिट्टा कराटेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरला मिळालेली ही खरंतर पोचपावतीच म्हणावी लागेल. सकाळ पॉडकास्टच्या मुलाखतीत 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाविषयी भरभरुन बोलताना बिट्टा कराटे या व्यक्तिरेखेचा प्रवास कसा घडून आला याविषयी अभिनेता चिन्मय मांडलेकरनं एक्सक्लुझिव्ह संवाद साधला आहे. या मुलाखतीत सर्वात एक्सक्लुझिव्ह मुद्दा काही असेल तर तो आहे चिन्मय मांडलेकरला एका काश्मिरी पंडितानं बाळासाहेबांविषयी(Balasaheb Thackeray) काय सांगितलं ते जाणून घेणं. त्यासाठी आपणास बातमीत जोडलेली लिंक क्लीक करुन मुलाखत संपूर्ण ऐकावी लागेल.

या सिनेमाचं जवळ-जवळ संपूर्ण शुटिंग मसूरी,देहरादूनमध्ये झालं आहे. संपूर्ण काश्मिरवर या सिनेमाचं कथानक आधारित असलं तरी सिनेमातला फक्त एकच सीन काश्मिरमधील श्रीनगरमध्ये शूट करण्यात आला आहे. त्या एकाच सीनसाठी काश्मिर(Kashmir)मध्ये गेलो असताना प्रचंड सुरक्षित वातावरणात शूटिंग केलं तरीदेखील गाडीच्या काचेतनं दिसलेल्या काश्मिरी लोकांच्या नजरेत जे दिसलं त्यावर चिन्मय ज्यापद्धतीनं या मुलाखतीत व्यक्त झालाय त्यानं अंगावर शहारा आल्याशिवाय अन् डोळ्याच्या कडा ओल्या झाल्याशिवाय राहणार नाहीत. ही मुलाखत देताना चिन्मयनं शूटिंग दरम्यान आलेले खूप छोटे-छोटे भावनिक अनुभव सांगितले आहेत. ही पॉडकास्ट मुलाखत बातमीत लिंकच्या माध्यमातून जोडलेली आहे. फक्त लिंक वर क्लीक करा आणि मुलाखत ऐका.

सिनेमाचा विषय गंभीर असल्यानं अखंड सिनेमा शूट करताना जेवढा ताण आला नाही तेवढा सगळा ताण सिनेमाचा क्लायमॅक्स शूट करताना आला. क्लायमॅक्स शूट होताना प्रत्येक जण अंतर्मुख झाला होता,असं चिन्मय म्हणाला. तर तो सीन शूट झाल्यानंतर कोणीच कोणाशी बोललं नाही. आज आपण तो सिनेमा पाहिला असेल तर कदाचित तो क्लायमॅक्स माहीत असेल. पण इथं चिन्मयनं आवर्जुन नमूद केलं की सबंध सिनेमात दिग्दर्शकानं सिनेमॅटिक लिबर्टि घेतली नाही पण तो क्लायमॅक्स शूट करताना ती घ्यावी लागली. कारण तितकं विदारक दृश्य आपण पडद्यावर दाखवू शकत नाही जे प्रत्यक्षात घडलं कारण प्रेक्षक ते सहन करू शकत नाही. काय घडलं होतं प्रत्यक्षात तेव्हा, त्या सीनसाठी का घेतली सिनेमॅटिक लिबर्टि यावर चिन्मय पहिल्यांदाच सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत व्यक्त झाला आहे. पण यासाठी बातमीत जोडलेली लिकं अर्थात चिनम्य मांडलेकरची मुलाखत नक्की ऐका. आणि बाळासाहेब ठाकरेंविषयी काय म्हणालाय काश्मिरी पंडित हे नक्कीच जाणून घ्यायचं असेल तुम्हाला. तेव्हा मुलाखत ऐकायला विसरु नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT