The Kerala Story Box Office Collection Day 10 Esakal
मनोरंजन

The Kerala Story BO: अदाच्या द केरळ स्टोरीनं शाहरुखच्या पठाणला केलं धोबीपछाड!कमाईचे आकडे भिडले गगनाला

Vaishali Patil

'द केरळ स्टोरी' अदा शर्माच्या या चित्रपटानं तिला वेगळीच ओळख निर्माण करुन दिली आहे. आधीच्या चित्रपटानं तिला जितकी ओळख मिळवुन दिली नाही तितकी प्रसिद्धी तिला केवळ द केरळ स्टोरीनं दिली.

आता या चित्रपटावरुन वाद तर सुरुच आहे मात्र वादासोबत चित्रपटाची कमाई देखील तितकीच जोराने सुरु आहे. चित्रपटाला रिलिज होऊन दहा दिवस झाले असले तरी हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तयार करत आहे.

राजकिय पक्षाच्या आक्षेप अन् चित्रपटाला बंदी घालण्याची मागणी, काहींचा पाठिंबा तर काहींचा कट्टर विरोध अशातही द केरळ स्टोरीची कमाई सुरुच आहे. पहिल्या दिवसापासून चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

पहिल्या वीकेंडमध्ये धमाकेदार कमाई केल्यानंतर 'द केरळ स्टोरी'ने दुसऱ्या वीकेंडलाही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. दुसऱ्या रविवारी चित्रपटानं किती कलेक्शन केलं हे पाहुया.

sacnilkच्‍या रिपोर्टच्‍या आकड्यांनुसार, 'द केरळ स्टोरी'च्‍या कमाईत दुस-या रविवारी म्हणजेच 10व्‍या दिवशी 23 कोटींच्या आसपास कमाई झाली. यासह, 'द केरळ स्टोरी'ची एकूण कमाई आता 135.99 कोटी रुपयांवर गेली आहे.

तर दुसरीकडे शाहरुखचा सुपरहिट चित्रपट पठाण ज्याने बॉक्स ऑफिसवर 1000कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचा रेकॉर्डही द केरळ स्टोरीनं मोडला आहे. sacnilk नुसार, शाहरुख खानच्या 'पठाण'ने 10 व्या दिवशी देशभरातील सर्व भाषांमध्ये केवळ 14 कोटींची कमाई केली आहे, तर 'द केरळ स्टोरी'ने 10 व्या दिवशी यापेक्षा 9 कोटी जास्त कमाई केली आहेत.

सुदीप्तो सेन यांनी निर्मीत आणि दिग्दर्शित केलेली द केरळ स्टोरी या चित्रपटाची कथा 3 गैर-मुस्लिम महिलांभोवती फिरते ज्यांचे ब्रेनवॉश करून ISIS या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यास भाग पाडलं जातं. चित्रपटात अदा शर्मा व्यतिरिक्त योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GOBAR-DHAN Scheme : पेट्रोलमध्ये इथेनॉल नंतर आता CNG-PNG मध्येही बायोगॅस मिसळला जाणार, सरकारची मोठी घोषणा

Dill Leaf Recipe: शेपूच्या पानांचा नवा ट्विस्ट! बनवा कर्नाटकातील प्रसिद्ध 'अक्की रोटी'

आजचे पंचांग 7 ऑगस्ट 2026! शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि दिनविशेष जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - ७ ऑगस्ट २०२६

युरिक ॲसिड - शरीरात वाढणारी आम्लता

SCROLL FOR NEXT