The Kerala Story, The Kerala Story box office, the kerala story full movie Esakal
मनोरंजन

The Kerala Story Box Office: चक्क RRR चा रेकॉर्ड मोडला, सिनेमाने गाठला इतक्या कोटींचा आकडा...

Vaishali Patil

अदा शर्माची मुख्य भुमिका असलेला द केरळ स्टोरी हा चित्रपट हा सध्या मनोरंजन विश्वात धुमाकूळ घालत आहे. 5 मे ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला रिलिज होऊन आता बरेच दिवस झाले आहे. या बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे आणि अजूनही हा चित्रपट कमाई करत आहे.

केरळ स्टोरीने वीकेंडला चांगली कमाई केली आहे. आता रिलीजच्या 11 दिवसांत चित्रपटाचे एकूण नेट कलेक्शन 150 कोटी इतकं झालं असल्याच बोललं जात असतांनाच रिलिजच्या दुसऱ्या सोमवारी या चित्रपटाने 10.5 कोटींची कमाई केली. एकूण कलेक्शन रु. 146.74 कोटी आहे आणि चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर 150 कोटींचा टप्पा लवकरच ओलांडेल.

चित्रपट 200 कोटींचा आकडा पार करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतांना द केरळ स्टोरी 250 कोटींचा आकडा सहज गाठेल असे म्हणता येईल. त्यातच लवकरच द केरळ स्टोरी हा वर्षातील दुसरा सर्वात मोठा बॉलीवूड चित्रपट बनेल.

त्याचबरोबर इतर देशांमध्येही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑस्ट्रेलियात चित्रपटाने चांगले कलेक्शन केले आहे. चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन पाहता, द केरळ स्टोरी विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाशी बरोबरी करू शकते, असं मानलं जाते. ज्याने गेल्या वर्षी 340 कोटींहून अधिक कमाई केली होती.

 'द केरळ स्टोरी'  याचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. तर कलाकारांबद्दल सांगायचं झाल तर अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

VIDEO: फार्महाऊसवर बिबट्याची एन्ट्री, मनसेच्या नेत्याचा पाळीव कुत्रा 'रॉकी'ची थरारक झुंज; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT