The Kerala Story Box Office Collection Day 7  Esakal
मनोरंजन

The Kerala Story BO: जितका वाद तितकी कमाई! द केरळ स्टोरी शंभर कोटींचा टप्पा गाठणार..

Vaishali Patil

सध्या मनोरंजन विश्वात फक्त सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. अदा शर्माच्या या चित्रपटाने अनेकांना विचार करायला भाग पाडले तर अनेकांनी याच चित्रपटाला प्रोपगंडा म्हणत विरोध केला आणि बंदीची मागणी घातली आहे.

तर काही राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. तर काही राज्यात या सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे.

इतका वाद सुरु असतांनाही हा सिनेमा अनेक दमदार प्रदर्शन करताना दिसत आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसादही मिळत आहे. आता हा चित्रपट लवकरच 37 देशांमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत.

हा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला होता. मात्र या वादाचा फायदा मात्र नक्कीच चित्रपटाला मिळाला आहे. केरळ स्टोरीला सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात माऊथ पब्लिसिटी मिळत आहे. त्यामुळेच रिलिजच्या इतक्या दिवसांनंतरही या चित्रपटाने भरघोस कमाई केली आहे.

(The Kerala Story Box Office Collection Day 7)

रिपोर्टनुसार, द केरळ स्टोरीने सातव्या दिवशी 12 कोटींची कमाई केली आहे, आता चित्रपटाने संपूर्ण आठवड्याच्या कमाईसह 80.86 कोटींची कमाई केली आहे, त्यामुळे चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्या 20 कोटींची आवश्यकता आहे. आजच्या कलेक्शनमध्ये हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होईल .

चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झाले तर पहिल्या दिवशी 8.03 कोटींची ओपनिंग केल्यानंतर या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 11.22 कोटी कमावले, त्यानंतर तिसऱ्या दिवशी 16.4 कोटी, चौथ्या दिवशी 10.07 कोटी आणि पाचव्या दिवशी 11.14 कोटींची कमाई केली. सहाव्या दिवशी 12 कोटींची कमाई केली आहे.

सुदीप्तो सेन दिग्दर्शित द केरळ स्टोरीमध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी मुख्य भूमिकेत दिसत आहेत. यातील अदा शर्माने शालिनीची भुमिका साकारली जी नंतर धर्मांतर करुन फातिमा होते. तिच या चित्रपटात तिची पुर्ण कहानी सांगते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT