The Kerala Story  Esakal
मनोरंजन

The Kerala Story: मध्यप्रदेश अन् उत्तरप्रदेश नंतर 'या' राज्यात 'द केरळ स्टोरी' टॅक्स फ्री...

Vaishali Patil

The kerala story tax free in Haryana: सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडला असतानाच चित्रपटगृहांमध्ये काही वेगळचं चित्र पाहयला मिळत आहे. 'द केरळ स्टोरी' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 70 कोटींच्या जवळपास गल्ला जमवला आहे.

या चित्रपटाबाबत प्रेक्षक आणि राजकिय नेत्यांमध्येदेखील दोन वेगळे दृष्टीकोन पाहयला मिळत आहे. काहींना हा चित्रपट खुप आवडला आहे तर काहींनी याला प्रोपगंडा म्हणत त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

अनेक राजकिय नेत्यांनी या चित्रपटाला समर्थन दिल आहे. त्याचबरोबर हा चित्रपट पाहण्याचे आश्वासनही दिल आहे. काही राज्याच्या सरकारने या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळावा म्हणुन त्याला टॅक्स फ्री केलं आहे.

'द केरळ स्टोरी' मध्य प्रदेशमध्ये करमुक्त करण्यात आली होती. यासोबतच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चित्रपटाचं कौतुक केले.

त्याच वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्यात आला आहे. आता यानंतर आता हरियाणातून 'द केरळ स्टोरी'ला राज्यात करमुक्त केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हरियाणामध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे.याबद्दल बोलतांना, सीएम मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले की, द केरळ स्टोरी हरियाणामध्ये करमुक्त करण्यात आली आहे. अशा स्थितीत इतर अनेक राज्यांमध्ये चित्रपट करमुक्त करण्याची मागणी आता होत आहे.

तर तामिळनाडूमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. याशिवाय ममता बॅनर्जींनी आदेश दिल्याने पश्चिम बंगालमध्ये सुद्धा 'द केरळ स्टोरी' वर बंदी घालण्यात आली आहे.मात्र या आदेशा विरोधआत चित्रपटाचे निर्मात्यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT