The Kerala Story Controversy Shabana Azmi on her opinion on The Kerala Story tweet viral  Esakal
मनोरंजन

The Kerala Story Controversy: 'द केरळ स्टोरी'ला बंदीची मागणी चुकीचीच! शबाना आझमींनी फटकारलं

Vaishali Patil

Shabana Azmi on The Kerala Story: अदा शर्मा स्टारर आणि विपुल शाह निर्मित आणि सुदिप्तो सेनद्वारा दिग्दर्शित 'द केरला स्टोरी' या चित्रपटाची सर्वत्रच जोरदार चर्चा झाली सुरु आहे. 5 मे ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला रिलिज होऊन तीन दिवस झाले असले तरी यावरुन सुरु झालेला वाद काही शांत होण्याचं नाव घेत नाही आहे. केवळ मनोरजंन विश्वच नाही तर राजकिय विश्वातही वातावरण चांगलचं तापलं आहे.

'द केरळ स्टोरी'वर बंदी घालण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत असला तरी बहुतांश मंडळींचा या चित्रपटाला विरोध आहे. तर तामिळनाडूमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.

त्यातच आता ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी 'द केरळ स्टोरी'च्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. सोमवारी त्यांनी या चित्रपटाविषयी ट्विट करत त्याचं मत मांडलं आहे. यावेळी शबाना म्हणाल्या की, ज्यांना चित्रपटावर बंदी घालायची आहे ते गेल्या वर्षी लालसिंग चड्ढावर बंदी घालणाऱ्यां इतकेच चुकीचे आहेत. शबानाचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.

शबाना यांनी ट्विट केले की, “जे लोक द केरळ स्टोरीवर बंदी घालण्याबद्दल बोलत आहेत ते आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटावर बंदी घालल्यासाठी इच्छूक होते. ते इतकेच चुकीचे आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने एकदा चित्रपटाला परवानगी दिली की नंतर कोणालाही घटना प्राधिकरण (constitutional authority) बनण्याची गरज नाही."

अशा शब्दात शबाना यांनी चित्रपटाला बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांना सुनावलं आहे. त्यांची बोलतीच बंद केली आहे. या चित्रपटात केरळ मधील ३२ हजार महिलांचे धर्मांतर करून त्यांचे शोषण करुन धर्मांतर करण्यात आल्याच सांगण्यात आलं होते. त्यानंतर झालेल्या वादामुळे मुलींची संख्या ३२ हजार वरुन तीन मुलींवर करण्यात आली.

अनेक राजकीय पक्ष व धार्मिक संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणीही केली होती. चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु केरळ उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आणि याचिकाकर्त्यांना फटकारलंही होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT