the kerala story fame adah sharma buy sushant singh rajput home thet he live before death  SAKAL
मनोरंजन

Adah Sharma: ज्या घरात सुशांत सिंग राजपुतने जीवन संपवलं तेच घर विकत घेतलं, अदा शर्माचा महत्वाचा निर्णय

द केरळ स्टोरी फेम अदा शर्माने सुशांत ज्या घरात शेवटपर्यंत राहत होता ते घर विकत घेतल्याची चर्चा आहे

Devendra Jadhav

'द केरळ स्टोरी'मधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अदा शर्मा. अदा शर्माने द केरळ स्टोरी सिनेमातुन सुंदर काम करुन प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. अदा आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय.

मीडिया रिपोर्ट्सचा दावा आहे की, अभिनेत्रीने मुंबईत हक्काचं घर विकत घेतलंय. अदाने जे घर विकत घेतलंय तिथे आधी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत राहत होता.

(the kerala story fame adah sharma buy sushant singh rajput home thet he live before death)

अदा आता सुशांतच्या घरात राहणार

अदाने जे नवीन घर घेतलंय त्याच घरात 2020 मध्ये सुशांतने याच घरात आत्महत्या केली होती. तेव्हापासून आतापर्यंत हे घर अनेकदा चर्चेत आले होते.

द केरळ स्टोरीच्या यशानंतर अदा शर्माची कारकीर्द सुसाट सुरू आहे. नुकतीच ती 'कमांडो' वेबसिरीजमध्ये दिसली होती. दरम्यान, अदा शर्माने मुंबईत स्वतःचे घर विकत घेतले आहे. 'टेली चक्कर'च्या रिपोर्टनुसार, अदा शर्माने सुद्धा या बातमीला दुजोरा दिला आहे. मात्र, ती कधी शिफ्ट होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याशिवाय तिने हे घर विकत घेतलंय की ती भाड्याने राहणार हेही अद्याप समजु शकले नाही.

सुशांतच्या मृत्युनंतर घराचं भाडं वाढलं होतं

मिडीयाच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर या अपार्टमेंटमध्ये घराचे भाडे वाढल्याची चर्चा होती. अनेकांना घर खरेदी करण्यात रस होता. आता अखेर हा करार अदा शर्माच्या हातात आला आहे.

सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू 14 जून 2020 रोजी झाला होता. 2021 मध्ये. मुंबईतील सी फेसिंग घर भाड्यावर असल्याची बातमी आली होती. या दुमजली घरासाठी सुशांत दरमहा साडेचार लाख रुपये भाडे देत असे.

अदा शर्मा काही दिवसांपुर्वी रुग्णालयात

'द केरळ स्टोरी' या चित्रपटामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री अदा शर्माची प्रकृती बिघडली आहे. काही दिवसांपुर्वीच तिला अचानक तब्येत बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. अदा शर्माला फूड अॅलर्जी झाली होती. तिला डायरियाची समस्या होती.

आता अदानं तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं आता काही दिवस कामातुन ब्रेक घेणार असल्याचं सागितलं. तिला पित्ताची समस्या उद्धभवल्यामुळे तिला अस्वस्थ वाटतं होतं. औषधांच्या परिणाम तिच्या त्वचेवर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT