the kerala story fame adah sharma new movie bastar director vipul amrutlal shah threatens by unknown  SAKAL
मनोरंजन

Bastar Adah Sharma: 'द केरळ स्टोरी'नंतर अदाचा नवीन सिनेमा 'बस्तर'ही वादात, दिग्दर्शकाला धमकी

द केरळ स्टोरीनंतर अदाचा नवीन सिनेमा अडकला वादाच्या भोवऱ्यात.

Devendra Jadhav

Bastar Vipul Amrutlal Shah News: काही महिन्यांपुर्वी रिलीज झालेल्या द केरळ स्टोरी सिनेमाने चांगलाच वाद ओढवुन घेतला. देशात अनेक ठिकाणी सिनेमावर बंदी घालण्यात आली. अभिनेत्री अदा शर्माने द केरळ स्टोरीमध्ये प्रमुख भुमिका सांगितली होती.

द केरळ स्टोरीनंतर तिच टीम सत्य घटनेवर आधारीत आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. हा सिनेमा म्हणजे बस्तर. पण हा सिनेमा रिलीजपुर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काय घडलंय नेमकं जाणुन घ्या.

(the kerala story fame adah sharma new movie bastar director vipul amrutlal shah threatens by unknown)

अदा शर्माच्या नवीन सिनेमाच्या दिग्दर्शकाला मिळाली धमकी

अदा शर्माचा बस्तर हा नवीन सिनेमा नक्षलवादाच्या विषयावर आधारित आहे. अमर उजालाने दिलेल्या माहितीनुसार, सिनेमाचे दिग्दर्शक विपुल यांनी चित्रपटाची घोषणा केल्यापासून त्यांना धमक्या येत आहेत.

हे लक्षात घेऊन विपुलच्या घरची सुरक्षा आता अपग्रेड करण्यात आली आहे. नव्या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून विपुल यांना येणाऱ्या धमक्यांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी विपुल यांची वैयक्तिक सुरक्षा वाढवण्यात आलीय.

बस्तर कधी रिलीज होणार?

बस्तर या सिनेमाच्या शुटींगला काहीच दिवसांपुर्वी सुरुवात झाली. या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, "देशाला धक्का देणारे आणखी एक सत्य." 'बस्तर' हा सिनेमा लास्ट मंक मीडिया यांच्या सहकार्याने सनशाइन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारा निर्मित आहे.

'बस्तर' हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे, या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल आणि कथेबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cheteshwar Pujara Retire: भारताचा 'टेस्ट स्पेशालिस्ट' निवृत्त! पुजाराने केली मोठी घोषणा; म्हणाला, 'प्रत्येक चांगली गोष्ट...'

Latest Marathi News Updates : सांगोला तालुक्यात लांडग्यांचा कहर!

'जर कोणी माझ्यासाठी या दोन गोष्टी केल्या, तर मी आयुष्यात कधीच दक्षिणा घेणार नाही'; बागेश्वर बाबांचे मोठे विधान

Viral Video : महिलेने वाचविलेला जीव, अनेक वर्षांनी दिसताच सिंहांनी मारली मिठी, हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

Thalapathy Vijay चा मेगा ब्लॉकबस्टर शो! Modi च्या सभेपेक्षा जास्त गर्दी, पडद्यावरून थेट मैदानात कसा आला?

SCROLL FOR NEXT