The Kerala Story
The Kerala Story  Esakal
मनोरंजन

The Kerala Story: नुसतं बोलत नाही करुन दाखवतो! धर्मांतर केलेल्या मुलींना....निर्मात्यांचा दानशूरपणा

Vaishali Patil

The Kerala Story Star Cast Fees: बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट मोठ्या वादाच्या भोवऱ्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 'द केरळ स्टोरी' रिलीज होऊन तेरा दिवस झाले आहेत. तरीही चित्रपट बक्कळ कमाई करत आहे.

'द केरळ स्टोरी' 2023 मधील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे चित्रपट ठरला आहे. तर कोरोनानंतर सार्वधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे. The Kerala Story ने देशभरात 13 दिवसात जवळपास 165.94 कोटींचा बॉक्स ऑफिस कलेक्शन केल आहे.

'द केरळ स्टोरी' ला काही राजकीय पक्ष आणि गटांच्या विरोधाचाही सामना करावा लागला आहे, मुस्लिम समुदायाविरूद्ध द्वेष पसरवण्याच काम हा चित्रपट करत आहे असं म्हणत या चित्रपटाला प्रोपगंडा देखील बोललं जात आहे. तर पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू सरकारने 'द केरळ स्टोरी'वर राज्यात बंदी घालण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेण्यात आली, ज्यामध्ये निर्माते विपुल शाह, दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि अदा शर्मा यांच्यासह चित्रपटाची स्टारकास्ट उपस्थित होती. यावेळी निर्मात्यांसोबत 26 पीडित मुलीही तिथे उपस्थित होते.

विशेष बाब म्हणजे याच कार्यक्रमात मुलींच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या आश्रमाला विपुल शहा यांनी 51 लाख रुपयांची देणगी देण्याचं जाहीर केली आहे.

याच पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, 'द केरळ स्टोरी'चे निर्माते विपुल शाह यांनी 300 पीडित महिलांचे पुनर्वसन करण्याऱ्या मी 51 लाख रुपये देईन.

या महिला केरळमध्ये धर्मांतराला बळी पडल्याचा आरोप आहे. 'द केरळ स्टोरी' ही अशा तीन मुलींची कथा आहे ज्यांचे ब्रेन वॉश करण्यात आले, धर्मांतर करण्यास भाग पाडले गेले आणि नंतर त्यांना ISIS सारख्या दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी सीरियाला पाठवण्यात आले.

यासोबतच 32 हजारांच्या संख्येवर विपुल शहा म्हणाले की, "आम्ही असे अनेक आकडे लवकरच समोर आणू. सोबतच 32 हजारांची आकडेवारीही सांगू. त्यानंतर मी बघेन की, ज्यांनी आमच्यावर टीका करणारे त्याच विधान आणि त्यांची भूमिका बदलेले का? पण ते आमच्याबद्दल काय विचार करतात याने आम्हाला फरक पडत नाही."

निर्मात्यांनी आश्रमातील 26 मुलींना चित्रपटाच्या कलाकारांसह मीडियाशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणातील अटकेतील डॉक्टरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून डॉ. तावरेसह हाळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव

Rishabh Pant: 'एअरपोर्टवरही जात नव्हतो, कारण...' टी20 वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी पंतने सांगितला अपघातानंतरचा अनुभव

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघातातील आरोपीला मद्य देणाऱ्या कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

Fact Check: कंगणा राणौतचा अबू सालेमसोबत फोटो व्हायरल झाल्याचा 'तो' दावा खोटा

Pune Porsche Car Accident: बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीचा 'असा' आहे दिनक्रम; पहाटे उठून करावी लागते प्रार्थना अन्...

SCROLL FOR NEXT