The Kerala Story  Esakal
मनोरंजन

The Kerala Story: आम्ही टिझरमधले आकडे बदलले नाही तर...द केरळ स्टोरी निर्मात्यांचा अजब दावा

Vaishali Patil

The Kerala Story Teaser Controversy: अदा शर्माचा 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित झाला. रिलीज झाल्यापासून देशभरात या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने 200 कोटींची कमाई करून अनेक विक्रमही नोंदवले आहेत.

आता या चित्रपटाला प्रदर्शित होवून महिना हाईल तरी देखील चित्रपटाची कमाई सुरु आहे. रिलिजपुर्वीच या चित्रपटावरून बराच वाद झाला होता. या चित्रपटाला काही राज्यांमध्ये बंदी घालण्याची मागणी केली तर काहींनी हा चित्रपट करमुक्त केला. द केरळ स्टोरी अजूनही तितकिच चर्चेत आहे.

चित्रपटाच्या तथ्यांबाबत बराच वाद झाला होता आणि आता त्याचे निर्माता आणि दिग्दर्शक यांनी व्हिडिओ शेअर करून 32,000 महिला गायब झाल्याचा खुलासा केला इतकच नाही तर त्यांनी यावर युक्तिवाद देखील केला आहे.

मात्र त्यांनी चित्रपटाच्या टिझरमध्ये सुरवातीला 32000 आणि नंतर 3 असा बदल केला आणि पुन्हा याबाबत चर्चा झाली.

आता ही वस्तुस्थिती कधीच चुकीची मानली नसून त्यांची फसवणूक झाली आहे, असा त्याचा विश्वास आहे.

चित्रपटाची अभिनेत्री अदा शर्माने एक व्हिडिओ शेअर केला आहे. 13 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतपाल शाह आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी सविस्तर संवाद साधला.

त्यानी टीझरमध्ये शेअर केलेल्या 32000 बेपत्ता महिलांचा आकडा कसा खरा होता हे सांगितले. पण टीझर व्हायरल झाल्यानंतर कोणीतरी त्याच्याशी छेडछाड केली आणि आकडा 3 केला असल्याच सांगितलं.

विपुल अमृतपाल यांनी सांगितले की, जे आकडे बदलले आहेत ते त्यांनी बदलले नव्हते आणि कोणीतरी ते हॅक करून त्यात छेडछाड करून आकडे बदलले.

निर्मात्याने व्हिडिओमध्ये अशी अनेक तथ्ये देखील शेअर केली आहेत, ज्यामध्ये केरळच्या बेपत्ता महिलांचे अनेक आकडे आहेत.

व्हिडिओमध्ये केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांचे विधानही आहे ज्यात ते काही वर्षांत केरळ इस्लामिक स्टेट बनेल असे म्हणताना दिसत आहेत. या सर्व बाबी आणि तथ्यांसह केरळ स्टोरीच्या निर्मात्यांनी त्यांची भूमिका या व्हिडिओच्या माध्यमातुन मांडली आहे.

या आधी अदा शर्मानं तिचे काही फोटो देखील सोशल मिडियावर शेयर केले होते. अदाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या अफगाणिस्तान शूटचे काही फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले, "#TheKeralaStory मधून, नंतर आणि आधी Sunkissed.

अशा फाटलेल्या ओठांचे रहस्य…यामध्ये तिने शूटशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. अदाने या पोस्टमध्ये खुलासा केला की, 40 तास पाणी न पिल्याने तिचे ओठ असे झाले आहेत. अदाने येथे मायनस 16 अंश सेल्सिअस तापमानात शूटिंग केले असल्याच सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: घाटकोपरच्या केव्हीके शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT