The Kerala Story, The Kerala Story news, The Kerala Story news, The Kerala Story box office, The Kerala Story release in britain
The Kerala Story, The Kerala Story news, The Kerala Story news, The Kerala Story box office, The Kerala Story release in britain SAKAL
मनोरंजन

The Kerala Story: आतंकवाद हरला, अखेर ब्रिटनमध्ये रिलीज होणार 'द केरळ स्टोरी', दिग्दर्शकाच्या आनंदाला उधाण

Devendra Jadhav

The Kerala Story release in Britain News: 'द केरळ स्टोरी'ने 12 दिवसांत बॉक्स ऑफिसवर सुमारे 150 कोटी रुपयांची कमाई केली आहे, द केरळ स्टोरी सिनेमावर ब्रिटनमध्ये बंदी आणली होती.

पण अखेर द केरळ स्टोरी अखेर यूकेमध्येही प्रदर्शित होत आहे. यापूर्वी हाऊसफुल्ल शो असूनही यूकेमध्ये सिनेमाचे रिलीज रद्द करण्यात आले होते. कारण ब्रिटनच्या सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला रिलीज प्रमाणपत्र दिले नव्हते.

(the kerala story to release in united kingdom director sudipto sen says terrorism lost)

सुदीप्तो सेन दिग्दर्शित द केरळ स्टोरी याआधी १२ मे रोजी यूकेमध्ये रिलीज होणार होता. पण ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशनने (बीबीएफसी) त्याला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला.

पण आता हा सिनेमा लवकरच यूकेमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती खुद्द दिग्दर्शकानेच ट्विटवर दिली आहे.

'द केरळ स्टोरी'चे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी ट्विटरवर आपला भारतीय ब्लॉकबस्टर चित्रपट यूकेमध्ये रिलीज होणार असल्याचा खुलासा केला आहे.

त्यांनी ट्विट केले, 'अभिनंदन ग्रेट ब्रिटन. तू जिंकलास. दहशतवाद हरला आहे.

तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. आता ब्रिटीश लोक दहशतवादाविरुद्धची सर्वात मोठी क्रांती पाहतील... #TheKeralaStory' अशी पोस्ट करत 'द केरळ स्टोरी' दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी केलीय.

सध्या रिपोर्टनुसार, सुदीप्तो सेनच्या  द केरळ स्टोरीने 12 व्या दिवशी 9.80 कोटी कमावले आहेत, त्यानंतर चित्रपटाने 150 कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि 156.84 कोटी कमावले आहेत. या आकड्याबरोबरच आता हा चित्रपट 2023 च्या वर्षातील 5 वा सर्वात मोठा ओपनर बनला आहे.

'द केरळ स्टोरी' याचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. तर कलाकारांबद्दल सांगायचं झाल तर अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी मुख्य भूमिकेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT