Seher Aly Latif  
मनोरंजन

'द लंचबॉक्स' चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टर सेहेर यांचे निधन

बॉलिवूड कलाकारांनी व्यक्त केला शोक

स्वाती वेमूल

'द लंचबॉक्स' The Lunchbox या चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टर आणि निर्माती सेहेर अली लतिफ Seher Aly Latif यांचं मुंबईत निधन झालं. कार्डिअॅक अरेस्टने ७ जून रोजी त्यांचं निधन झालं. सेहेर यांचं वय चाळीशीत असल्याचं म्हटलं जात आहे. मूत्रपिंड निकामी झाल्याने सेहेर यांना जवळपास आठ दिवसांपूर्वी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिग्दर्शक नीरज उधवानी यांनी याबद्दलची माहिती दिली. 'म्युटंट फिल्म्स' या स्वतंत्र निर्मिती कंपनीच्या या सहसंस्थापक होत्या. 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'भाग बिनी भाग' या वेब सीरिज आणि 'मस्का' या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. (The Lunchbox casting director Seher Aly Latif dies of cardiac arrest in Mumbai)

सेहेर यांच्या निधनाच्या वृत्तानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला. 'द लंचबॉक्स' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री निम्रत कौरने ट्विट करत लिहिलं, 'माझ्या आयुष्यातील सर्वांत प्रेमळ आणि दयाळू व्यक्ती. निधनाचं वृत्त मला अजूनही खोटं वाटतंय', अशा शब्दांत निम्रतने दु:ख व्यक्त केलं. दिग्दर्शक रितेश बत्रा, अभिनेत्री स्वरा भास्कर यांनीसुद्धा सोशल मीडियाद्वारे सेहेर यांना श्रद्धांजली वाहिली.

'शकुंतला देवी', 'दुर्गामती' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांसाठी त्यांनी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलं. 'ईट प्रे लव्ह', 'झिरो डार्क थर्टी', 'मॅकमाफिया', 'सेन्स8', 'फ्युरियस ७' आणि 'हंड्रेड फूट जर्नी' या चित्रपटांसाठीही त्यांनी काम केलं होतं. अक्षय कुमारच्या 'गोल्ड' या चित्रपटाची सहनिर्मिती सेहेर यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT