KK Goswami, KK Goswami news, KK Goswami accident SAKAL
मनोरंजन

KK Goswami: चालती कार पेटली अन्.. 'शक्तिमान' फेम केके गोस्वामीला मोठा धक्का.. २१ वर्षांचा मुलगा..

सध्या कारला आग कशी लागली याचा तपास पोलीस करत आहेत.

Devendra Jadhav

KK Goswami News: 'शक्तिमान', 'गटर गू'सह इतर टीव्ही शोमध्ये दिसलेला अभिनेता केके गोस्वामी एका मोठ्या घटनेतून थोडक्यात बचावला आहे.

मुंबईत प्रवास करताना त्यांच्या कारला आग लागली. त्यांचा मुलगा 21 वर्षांचा मुलगा नवदीप हि गाडी चालवत होता.

ही घटना मुंबई शहराच्या मध्यभागी असलेल्या एसव्ही रोडवर घडली. केके गोस्वामी यांचा मुलगा कारने आपल्या घरातून फिल्मिस्तान स्टुडिओजवळ कॉलेजकडे जात होता. या घटनेमुळे गोस्वामी यांच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे.

(The moving car caught fire and.. 'Shaktiman' fame KK Goswami got a big shock.. 21 year old boy..)

हेही वाचा: What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

नेमकं काय घडलं?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवदीप कार चालवत असताना अचानक आग लागली. सुदैवाने अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. केके गोस्वामी यांचा मुलगा या दुर्घटनेतून थोडक्यात बचावला.

त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे घडली नाही. सध्या कारला आग कशी लागली याचा तपास पोलीस करत आहेत.

केके गोस्वामी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर.. केके गोस्वामी हे बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अभिनेता होण्यापूर्वी ते स्वतः गावात स्टुडिओ चालवत होते.

3 फुट उंची असलेल्या केके गोस्वामी यांनी मुंबईत आल्यानंतर खूप संघर्ष केला.

ते सुरुवातीच्या काळात एका बिअर बारमध्ये काम करत होते. पण तिथेच एका सिक्युरिटी गार्डने दांडका घेऊन त्यांचा पाठलाग केला होता. सुरुवातीला फक्त पाणी पिऊन दिवस काढणाऱ्या केके गोस्वामी यांना पुढे भरपूर लोकप्रियता मिळाली.

केके गोस्वामीबद्दल सांगायचे झाले तर त्यांचे खरे नाव कृष्णकांत गोस्वामी आहे. त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये काम केले आहे.

'शक्तिमान', 'गटर गू', 'ज्युनियर जी', 'भाभी जी घर पर हैं', 'शका लका बम बम', 'सीआयडी', 'चक्रवर्ती अशोक सम्राट', 'विक्राल और गबराल' अशा मालिकांमधून केके यांनी फॅन्सच्या मनात राज्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT