Anil Kapoor and Aditya Roy Kapur
Anil Kapoor and Aditya Roy Kapur Esakal
मनोरंजन

The Night Manager Part 2 Trailer: 'हिसाब अभी बाकी है..', शैलीची लंका जाळणार शॉन! बघा धमाकेदार ट्रेलर..

Vaishali Patil

The Night Manager Part 2 Trailer: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आदित्य रॉय कपूर आणि अनिल कपूर यांची जोडी OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारच्या 'द नाईट मॅनेजर' या सिरिजमध्ये एकत्र दिसली आहे. 'द नाईट मॅनेजर' वेब सिरीज ही ब्रिटीश वेब सिरीज नाईट मॅनेजरचा हिंदी रिमेक होता. क्राइम थ्रिलर असलेल्या या 'द नाईट मॅनेजर' या वेब सीरिजला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं.

पहिल्या सीझनमध्ये या दोन्ही कलाकारांच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. पहिला भाग सुपरहिट झाल्यानंतर चाहते 'द नाईट मॅनेजर'च्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते.

या सिरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला आहे. या सिझनमध्ये शॉन सगळ्या सस्पेन्सवरील पडदा उघडणार आहे.

अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धुलिपाला अभिनीत हा शो डिस्ने प्लस हॉटस्टारवर 30 जून 2023 रोजी प्रदर्शित होईल. त्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

'द नाईट मॅनेजर' या सिरिजच्या दुसऱ्या भागाची सुरवात होते ती एका दमदार व्हाईस ओव्हरने..ज्यात आदित्य म्हणतो की, रावणाची लंका जाळण्यासाठी आग तर लावावीच लागेल. यानंतर मोठा धमाका होतो आणि धमाकेदार टिझरला सुरुवात होते.

ट्रेलरमध्ये आदित्य रॉय कपूर शॉन सेनगुप्ताची भूमिका साकारत आहे, जो माजी इंटेलिजेंस अधिकारी आहे आणि शैलेंद्र रुंगटा उर्फ ​​अनिल कपूरच्या टोळीत सामील होऊन त्याचा व्यवसाय उद्ध्वस्त करतो आणि त्याच्याविरुद्ध एक योजना आखतो. ज्यामुळे सस्पेंस निर्माण होईल.

शॉन टिम मध्ये सहभागी होतो आणि त्यांचा विश्वास संपादित करतो आणि त्यानंतर एक एक करुन त्याचे व्यवसाय बंद करतो. पहिल्या भागात शॉनने अनेक रहस्यांवर पडदा टाकला होता त्यामुळे आता या भागात तो सर्व रहस्य उडगडणार आहे.

संदीप मोदी यांची ही हिंदी भाषेतील क्राईम थ्रिलर टीव्ही मालिका तयार केली आहे. जॉन ले कॅरे यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित ब्रिटीश टीव्ही मालिका द नाईट मॅनेजर (2016) चा हा रिमेक आहे.

यात अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धुलिपाला यांच्याशिवाय तिलोत्तमा शोम, रवी बहल, शाश्वत चॅटर्जी सहाय्यक भूमिकेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT