Leonardo-Nilam Dating : २० वर्षे मोठ्या टायटॅनिकच्या हिरोच्या प्रेमात पडणारी निलम गिल आहे कोण?

लिओनार्दोचे नाव हे भारतीय वंशाची मॉडेल निलम गिलसोबत जोडले जात आहे. दुसरीकडे हॉलीवूडचा लिओनार्दोचे वय आणि त्या मॉडेलच्या वयाची चर्चा रंगली आहे.
 Leonardo Di Caprio Nilam Gill Dating Rumors
Leonardo Di Caprio Nilam Gill Dating Rumors esakal

Leonardo DiCaprio-Neelam Gill Dating Rumors : हॉलीवूडचा प्रसिद्ध टायटॅनिक चित्रपट हा आपल्या माहिती आहे. त्यात जॅकची भूमिका करणारा लिओनार्दो दी कॅप्रिओ त्या चित्रपटानंतर खूपच लोकप्रिय झाला होता. हॉलीवूडमध्ये सध्या तो सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आता त्याची पुन्हा आठवण होण्याचे कारण म्हणजे त्याची आणि एका मॉडलेच्या डेटिंगची चर्चा रंगली आहे. Leonardo DiCaprio-Neelam Gill Dating Rumours

लिओनार्दोचे नाव हे भारतीय वंशाची मॉडेल निलम गिलसोबत जोडले जात आहे. दुसरीकडे हॉलीवूडचा लिओनार्दोचे वय आणि त्या मॉडेलच्या वयाची चर्चा रंगली आहे. लिओचे वय ४८ आहे तर निलमचे वय २८ वर्षे आहे. दोन्ही सेलिब्रेटींकडून अजुन त्या डेटिंगबाबत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया समोर आलेली नसली तरी सोशल मीडियावर मात्र चाहत्यांनी, नेटकऱ्यांमध्ये वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

Also Read - Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

निलम ही भारतीय वंशाची मॉडेल आहे. तिचा जन्म लंडनमध्ये १९९५ मध्ये झाला. तिचे वडील हे युकेमध्ये स्थित आहेत. तिचे आजोबा हे भारतातील पंजाबमध्ये राहणारे होते. एका मुलाखतीमध्ये तिनं सांगितले होते की, लहान असतानाच तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ते वेगळे झाले. तिनं असाही खुलासा केला होता की, माझ्या सावत्र आई वडिलांनी मला मॉडेलिंग मध्ये येण्यासाठी प्रेरणा दिली. आणि माझा वेगळा प्रवास सुरु झाला.

मॉडेलिंगच्या दुनियेत निलमच्या नावाचा बोलबाला आहे.तिनं त्यावरुन मोठी ओळखही मिळवली आहे. ती स्वताची ओळख ब्रिटिश पंजाबी मॉडेल अशी करुन देते. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षांपासून तिनं मॉडेलिंगच्या करिअरला सुरुवात केली होती. आता ती त्यामध्ये मोठी आयकॉन झाल्याचे दिसून आले आहे. निलमनं बरबेरी कँपेनमध्ये पहिली भारतीय मॉडेल होण्याचा मानही मिळवला आहे.

 Leonardo Di Caprio Nilam Gill Dating Rumors
72 Hooren : 'द्वेष फार काळ चालणार नाही बाळा!' केरळ स्टोरीनंतर '72 हुरे' चा वाद

नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरच्या उद्धघाटनाला निलम आली होती. निलम त्या सोहळ्याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेयर केले होते. त्यापूर्वी भारतामध्ये डायोरच्या पहिल्या शोमध्ये तिनं रँप वॉक देखील केला होता. सोशल मीडियावर निलमला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ती तिच्या वेगळ्या अंदाजासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे.

 Leonardo Di Caprio Nilam Gill Dating Rumors
Hollywood Movie: अर्ध्या रात्री एकट्याने पाहून दाखवाच..! आगामी हॉलिवूड सिनेमासाठी थिएटरवाल्यांनी दिलं चॅलेंज..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com