Navya Nanda: अमिताभची नात करतेय 'या' अभिनेत्याला डेट? व्हिडिओ व्हायरल...

navya naveli nanda
navya naveli nandaEsakal

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा भलेही चित्रपटांमध्ये सक्रिय नसेल, पण तिची लोकप्रियता एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. अनेकदा ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

गेल्या काही दिवसांपासून नव्या आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या डेटिंगच्या बातम्या येत आहेत. या दोघांकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नसले त्यांची चर्चा होतेच.

navya naveli nanda
Rasha Thadani: 'एक बार जो मैंने कमिटमेंट दी..', रविनाच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल! काय आहे प्रकरण

त्याच्या डेटिंगच्या अफवांना तेव्हा सुरुवात झाली जेव्हा ते बांद्रा येथील एका कॅफेच्या बाहेर एकत्र ते दिसले होते, जिथे नव्याने तिचा चेहरा लपवला होता, त्यानंतर ते एका पार्टीतही ते एकत्र दिसले होते. इतकंच नाही तर नव्याची आई श्वेता बच्चन नंदा यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतही सिद्धांत दिसला होता.

त्यामुळे हे दोघही रिलेशनशीपमध्ये आहेत अशा चर्चा सुरु झाल्या. आता मात्र दोघेही पहिल्यांदाच गोव्यात सुट्टी साजरी केली. ते दोघंही एकत्र परतले आणि पापाराझींनी त्यांना विमानतळावर स्पॉट केले.ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

navya naveli nanda
ZHZB Box Office Collection Day 3: विकी-साराची जोडी हिट की फ्लॉप? विकेंडला जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला

यावेळी नव्या आणि सिद्धांत दोघेही पांढऱ्या टी-शर्टमध्ये ट्विनिंग करताना दिसले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, जो पाहून लोक त्यांचे चाहते झाले आहेत. ते दोघे एकत्र खूप क्यूट दिसत आहेत. असल्याचंही नेटकरी म्हणत आहे.

navya naveli nanda
Neena Gupta: 'वाढदिवस काय करता शोक व्यक्त करा...' 64 व्या वाढदिवशी निना गुप्ताचा सल्ला! नेटकऱ्यांना बसला धक्का

या अफेयरच्या चर्चाबद्दल जेव्हा त्याला मिडियात विचारण्यात आलं होत की ही अशी कोणती अफवा खरी व्हावी असं तुला वाटत त्यावेळी कोणासोबतची डेटींगची अफवा खरी ठरण्याची इच्छा त्यांने व्यक्त केली होती.

सिद्धांतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाले तर त्याला खरी ओळख रणवीर सिंहच्या गली बॉय या चित्रपटातुन मिळाली. तो शेवटचा कतरिना कॅफसोबतचा चित्रपट 'फोन भूत' मध्ये दिसला होता.

navya naveli nanda
Kollam Sudhi Death: ग्रहण हटेना! कार अपघातात अभिनेत्याचा मृत्यू, आणखी तीन कलाकार गंभीर जखमी...

तर नव्या नवेली ही चित्रपटात सक्रिय नाही. नव्या तिचा पॉडकास्ट शो 'व्हॉट द हेल नव्या' होस्ट करते ज्याला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com