मनोरंजन

लग्नाची गोष्ट ; ‘बेगम’बरोबर रंगलेली भागीदारी!

सचिन दरेकर हे नाव मनोरंजन सृष्टीतील सुपरिचित आहे.

राजसी वैद्य

- सचिन व क्षिप्रा दरेकर

सचिन दरेकर हे नाव मनोरंजन सृष्टीतील सुपरिचित आहे. विविध मालिका, चित्रपटांच्या कथालेखनासोबतच ‘पार्टी’ या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आगे. त्यांनी लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली ‘एक थी बेगम’ ही वेबसिरीज गाजत आहे. या प्रवासात त्यांना साथ लाभत आहे त्यांची पत्नी क्षिप्रा दरेकर यांची. क्षिप्रा कलर्स या हिंदी चॅनेलमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत. सचिन आणि क्षिप्रा यांच्या लग्नाला १३ वर्ष झाली. काही वर्षांपूर्वी ईटीव्ही मराठीमध्ये क्षिप्रा काम करत असताना त्याच चॅनेलच्या एका मालिकेचे लेखन सचिन करत होते. यादरम्यान त्यांची ओळख झाली. पुढं त्यांची मैत्री वाढत गेली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

क्षिप्रा यांच्याबद्दल बोलताना सचिन म्हणाले, ‘‘क्षिप्रा माझी चांगली माझी मैत्रीणही आहे. आम्ही प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर करतो. ती खूप समजूतदार आहे. एखाद्या गोष्टीवर ती पटकन व्यक्त होते, पण त्या गोष्टीवर नीट विचार केल्यावर ती लगेच समजून घेते. ती स्वच्छताप्रिय आहे. तिच्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या आणि जागच्याजगी असतात. तिच्यासोबत राहून मलाही तसं वागणं हळूहळू जमू लागलं आहे. लेखक म्हणून काही वर्षं काम केल्यावर मी दिग्दर्शनात पाऊल टाकण्याचं ठरवलं. अशा वेळी तुम्हाला आर्थिक, मानसिक पाठिंब्याची खूप गरज असते. तो सगळा सपोर्ट मला क्षिप्रानं केला आहे. ‘तुला ही गोष्ट मनापासून करावीशी वाटतेय ना, मग तू ती कर. बाकी सगळं आपण बघून घेऊ,’ अशी तिची वाक्यं असतात. तिच्या या सकारात्मक ॲटिट्युडमुळं मलाही काम करायला खूप प्रोत्साहन मिळतं.’’

क्षिप्रानं सांगितलं, ‘‘सचिन अत्यंत मॅच्युअर, प्रेमळ आणि समंजस आहे. तो सगळ्यांशी प्रेमाने वागतो. कमालीचा संयमी आहे. कोणत्याही सिच्युएशनवर पॅनिक न होता शांतपणे विचार करून रिअॅक्ट करणं हा त्याचा गुण मला फार भावतो. दिग्दर्शक म्हणूनही सेटवर तो खूप संयमी असतो. तो क्वचितच चिडतो. त्याच्यात नेतृत्वगुण खूप चांगला आहे. कधीही तो फक्त स्वतःचा विचार करत नाही. स्पॉट बॉयपासून कलाकार, तंत्रज्ञांपर्यंत तो सर्वांची काळजी घेतो, सगळ्यांना सांभाळून घेतो. सगळ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देतो. मला त्याच्या सगळ्याच कलाकृती आवडतात, पण त्याने लिहिलेला ‘कॅण्डल मार्च’ हा चित्रपट मला विशेष आवडतो. तर ‘एक थी बेगम’ ही सचिन यांनी पहिलीच हिंदी वेबसिरिज असल्याने तीही क्षिप्रा यांच्यासाठी खूप स्पेशल आहे. ‘‘वेबसिरिजला मिळणारा प्रतिसाद माझ्या कामाची पावती आहे. यामुळं आपण योग्य मार्गावरून जात आहोत, याची मला खात्री झाली आणि आणखीन नवनवीन कलाकृती प्रेक्षकांसमोर घेऊन येण्यास प्रोत्साहन मिळालं आहे,’’ असं सचिननं सांगितलं.

सचिन आणि क्षिप्रा यांच्यातील समान धागा म्हणजे त्या दोघांचं क्रिकेटवर असलेलं प्रेम. सचिन यांना कोणत्या साली कोणता सामना कुठे रंगला, त्यात कोणी किती धावा केल्या, हे तोंडपाठ असतं. ते त्यांच्या वर्णनातून सगळ्यांसमोर त्या मॅचचं चित्र उभं करू शकतात, असं क्षिप्रानं आवर्जून सांगितलं.

(शब्दांकन : राजसी वैद्य)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT