The Vaccine War Movie Pallavi Joshi Actress
The Vaccine War Movie Pallavi Joshi Actress esakal
मनोरंजन

The Vaccine War : 'तुम्ही चित्रपट न पाहताच कसं म्हणता प्रोपगंडा? हिंमत असेल तर....' पल्लवी जोशींचे नेटकऱ्यांना आव्हान

युगंधर ताजणे

The Vaccine War Movie Pallavi Joshi Actress : ज्यांनी द काश्मिर फाईल्स पाहिला असेल त्यांना विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी कोण आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तब्बल तीनशे कोटींपेक्षा जास्त कमाई करुन या चित्रपटानं प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. देशातील आजवरचा सर्वाधिक वादग्रस्त चित्रपट काश्मीर फाईल्सची नोंद घेतली गेली होती.

आता अग्निहोत्री हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.त्याचे कारण या महिन्यात त्यांचा येणारा द व्हॅक्सिन नावाचा चित्रपट. २८ सप्टेंबर रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.त्यात प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरीजा ओक, अनुपम खेर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. सध्या निर्माते आणि दिग्दर्शक हे या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे.

Also Read - Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर पडणारा लिबिया आता पूराच्या

सोशल मीडियावर द व्हॅक्सिन वॉर हा एक प्रोपगंडा मुव्ही असल्याच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. त्यावर निर्मात्या आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी परखडपणे ट्रोलर्सला उत्तर दिले आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर आगपाखड केली आहे. त्या म्हणतात, विरोध करणारे कधीही चित्रपट पाहत नाही. त्यांनी तो पाहिला तर त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीही नसते.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पल्लवी जोशी म्हणाल्या की, मला ट्रोल करणाऱ्यांविषयी काहीही बोलायचे नाही. त्याचे कारण ती लोकं चित्रपट पाहत नाहीत. आणि ती लोकं माझ्या चित्रपटाचा प्रेक्षकवर्गही नाहीत. त्यामुळे मी काय सांगते, म्हणते ते त्यांच्यापर्यत पोहचत नाही. त्यांना त्या कलाकृतीतील भावनाही समजत नाही.

यावेळी पल्लवी जोशी यांनी द ताश्कंद फाईल्स नावाच्या त्यांच्या चित्रपटाची आठवण करुन दिली. त्या म्हणाल्या, त्या चित्रपटाला देखील प्रोपगंडा असे म्हटले गेले होते. लाल बहादुर शास्त्री हे तर कॉग्रेसचे नेते होते. तर मग ती प्रोपगंडा फिल्म कशी असू शकते, मला तर काहीच समजत नाही. असा हा सगळा प्रकार आहे. असे मत जोशी यांनी यावेळी व्यक्त केले होते.

मला त्या लोकांना सांगायचे आहे की, व्हॅक्सीन वॉरला ट्रोल करणाऱ्यांनी तो चित्रपट एकदा पाहावा आणि त्यानंतर ठरवावे. मला माहिती आहे की, ट्रोल करणाऱे तो चित्रपट पाहणार नाहीत. कारण त्यांनी तो चित्रपट पाहिला तर ते बदलून जातील. त्यांचे विचार बदलतील. असेही पल्लवी जोशी यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT