मनोरंजन

थिएटर सुरु करण्यावर आठवडाभरात निर्णय

कोरोनाची corona दुसरी लाट second phase ओसरल्यानंतर तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाची corona दुसरी लाट second phase ओसरल्यानंतर तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे. त्यासाठी प्रशासनानं पूर्ण तयारीही केली आहे. वेगवेगळ्या स्तरांवर त्याची चाचणीही करण्यात आली आहे. वैद्यकीय सोयीसुविधा, औषधोपचाराकरिता प्रशासकीय पातळीवर चर्चाही सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून थिएटर theater सुरु करण्यासाठी कलाकार मंडळींकडून चर्चा प्रशासनाशी चर्चा सुरु आहे. त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले आहे. अशावेळी मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लॉकडाऊनच्या काळात बॅकस्टेज आर्टिस्ट back stage artist यांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागलं होतं. आता त्यांना दिलासा देणारी एक बातमी पुढे आली आहे.

दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कमी असल्याचेही बोलले जात आहे. यापार्श्वभूमीवर सरकारनं महाराष्ट्रातील थिएटर सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता सरकारनं राज्यातील थिएटर आणि त्याची आकडेवारी घ्यायला सुरुवात केली आहे. यानिमित्तानं राज्य सरकार हे कलाकार मंडळीशी संवाद साधणार आहे. यापूर्वी काही कलाकारांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. लॉकडाऊनचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्राला बसला होता. अनेक चित्रपटांचे प्रदर्शन रखडले होते. त्यामुळे त्यांना नाइलजानं ओटीटीचा पर्याय स्वीकारला होता. अनेक मोठ्या निर्मात्यांनी ओटीटीवर आपले चित्रपट प्रदर्शित केले होते. त्यालाही बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले आहे.

अक्षय कुमारचा बेल बॉटम हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट होता. त्या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या प्रमाणावर अपेक्षा होत्या. मात्र त्या पूर्ण करण्यात बेल बॉटम अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. येत्या काळातही मोठमोठ्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. मात्र ते थिएटरमध्ये प्रदर्शित होणार की ओटीटीवर याबाबत अजून संभ्रम आहे. त्यामुळे सरकारशी चर्चा करुन निर्माते, दिग्दर्शक निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

कानपूरमधील आयआयटीमधील एका शास्त्रज्ञानं दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कमी असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात आपल्याला दिलासा मिळाला आहे. येत्या काळात थिएटर चालकांसाठी समाधानकारक निर्णय महाराष्ट्र प्रशासन घेणार आहे. त्याची बैठकही पुढील आठवड्यात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT