these bollywood movies must watch on Childrens Day 2023 presenting childhood
these bollywood movies must watch on Childrens Day 2023 presenting childhood sakal
मनोरंजन

Childrens Day 2023: आज हे चित्रपट बघाच! तुम्हाला तुमचं बालपण आठवल्यावाचून राहणार नाही..

सकाळ डिजिटल टीम

Childrens Day 2023: आज 'बालदिन' (Childrens Day 2023). पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती त्या निमित्ताने देशभरात आज 'बालदिन' साजरा केला जात आहे. कारण नेहरूंचे लहान मुलांवर खूप प्रेम होते.

त्यामुळे आजच्या दिवसाला प्रचंड महत्व आहे. आपणही एकेकाळी बालपण जगलेलो असतो किंवा आजही आपल्यातलं बालपण जपत असतो, टेक बालपण साजरा करण्याचा हा दिवस. त्या निमित्ताने पाहूया बॉलीवुडमधले काही चित्रपट ज्यातून महान मुलांचे भावविश्व रेखाटले आहे.

मासूम (Masoom) : 'मासूम' हा सिनेमा 1983 साली प्रदर्शित झाला होता. लहान मुलांच्या समस्येवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. या सिनेमात नसीरुद्दीन शाह, शबाना आजमी, सुप्रिया पाठक आणि जुगल हंसराज मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमातील 'लकडी की काठी' हे गाणं आजच्या पिढीलाही तितकच भावतं.

तारे जमीन पर (Taare Zameen Par) : 'तारे जमीन पर' हा लोकप्रिय सिनेमा 2007 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. शिक्षणापेक्षाही लहान मुलांचं एक वेगळं जग असू शकतं यांची जाणीव करून देणारा हा चित्रपट केवळ बालकांसाठी तर पालकांसाठीही आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खान या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

आय एम कलाम (I am Kalam) : नीला माधब पांडाने दिग्दर्शित 'आय एम कलाम' हा सिनेमा चांगलाच चर्चेत राहिला होता. प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन कुटुंबाचं नाव मोठं करणाऱ्या मुलाच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे.

स्टॅनले का डब्बा (Stanley Ka Dabba) : 'स्टॅनले का डब्बा' हा सिनेमा 2011 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अमोल गुप्ते दिग्दर्शित हा चित्रपट शालेय जीवनातील घटनांची आठवण करून देतो. काही भावनिक प्रसंगही या सिनेमात आहेत.

चिल्लर पार्टी (Chillar Party) : 'चिल्लर पार्टी' हा सिनेमा लहान मुलांवर भाष्य करणारा आहे. या कौटुंबिक सिनेमाचं दिग्दर्शन नितेश तिवारी आणि विकास बहलने केलं आहे. या सिनेमालादेखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. एखाद्या जनावराला वाचवण्यासाठी चिल्लर पार्टीला करावी लागणारी धडपड या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT