Shehnaaz Gill and Salman Khan  Sakal
मनोरंजन

Shehnaaz Gill: शहनाज गिलचे हे मोठे स्वप्न राहिले अधुरे, सलमान खान करू शकेल का पूर्ण?

शहनाज गिल लवकरच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Aishwarya Musale

'बिग बॉस 13' मधून लोकप्रियता मिळविणाऱ्या शहनाज गिलच्या चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पंजाबची कतरिना कैफ जेव्हा जेव्हा शहरात पाऊल ठेवते तेव्हा तिचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतात. नुकतीच ती बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत दिसली होती.

शहनाज गिल लवकरच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शहनाजने अलीकडेच एका चित्रपटात सलमानसोबत मुख्य भूमिकेत काम करण्याची तिची इच्छा असल्याचे सांगितले.

'किसी का भाई किसी की जान' ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. या चित्रपटाने खळबळ उडवून दिली आहे. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहे. या चित्रपटात सलमान खानशिवाय पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल, भूमिका चावला आणि व्यंकटेश दग्गुबती यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

शहनाज गिलने एका नव्या मुलाखतीत सांगितले की, सलमानसोबत या चित्रपटात काम करून तिला खूप आनंद होत आहे. मात्र, तिने सलमानची हिरोईन बनण्याची इच्छा व्यक्त केली.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना शहनाजला जेव्हा विचारण्यात आले की ती सलमानसोबत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत कधी दिसणार आहे. यावर शहनाजने हसून उत्तर दिले की, मला याबद्दल काहीच माहिती नाही.

अभिनेत्रीने शेअर केले, 'मला माहित नाही, फक्त कास्टिंग डायरेक्टर किंवा सलमान सरांना माहित असेल. माझी सर्वांशी चांगली केमिस्ट्री आहे. मला आशा आहे की सलमान सर हे स्वप्न पूर्ण करतील की मी त्यांच्यासोबत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत काम करेल.

त्याच्यासोबत नाही तर त्याच्या मागे उभे राहून काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले याचा मला खूप आनंद आहे. मला त्याची अभिनेत्री व्हायचे आहे, पण एकत्र काम करणे हाही माझ्यासाठी बहुमान आहे.

दरम्यान, फरहाद सामजी दिग्दर्शित 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट या ईदला २१ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT