Suresh Wadkar Madhuri Dixit 
मनोरंजन

'या' कारणामुळे सुरेश वाडकरांनी नाकारलं होतं माधुरी दीक्षितचं स्थळ

माधुरीचे वडील सुरेश वाडकरांकडे माधुरीचं स्थळ घेऊन गेले होते.

स्वाती वेमूल

जिच्या हास्यावर आणि सौंदर्यावर जगभरातील कोट्यवधी चाहते फिदा आहेत, अशी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित Madhuri Dixit. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत तिच्या अभिनयाचे, नृत्याचे चाहते आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अर्थात माधुरीसारखीच आपली पत्नी किंवा प्रेयसी असावी, अशी अनेक मुलांची अपेक्षा असते म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. पण तुम्हाला माहित आहे का, खुद्द माधुरीला एकदा नकार पचवावा लागला होता. होय, तेसुद्धा अरेंज मॅरेजचा विचार सुरु असताना. (this is the reason why singer suresh wadkar refused marriage proposal of madhuri dixit)

माधुरीचे कुटुंबीय जेव्हा तिच्या लग्नाचा विचार करत होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर गायक सुरेश वाडकर Suresh Wadkar यांचं नाव आलं होतं. इतकंच नव्हे तर, वाडकरांना याबद्दल विचारण्यातही आलं होतं. पण त्यांनी हे स्थळ स्पष्टपणे नाकारलं. माधुरीचे वडील सुरेश वाडकरांकडे माधुरीचं स्थळ घेऊन गेले होते. तेव्हा ते संगीतसृष्टीत आपला जम बसवत होते. शिवाय वाडकर आणि माधुरी यांच्या वयात १२ वर्षांचा फरक होता.

वाडकरांनी लग्नाचं स्थळ नाकारताना कारणंही अजबच दिलं. मुलगी खूपच बारीक असल्याचं कारण देत त्यांनी नकार दिला होता. या नकारामुळे माधुरीच्या आई-वडिलांना खूप दु:ख झालं होतं. नंतरच्या काळात वाडकरांनी माधुरीच्या अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केलं होतं.

माधुरीने १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून परदेशात संसार थाटला. या दोघांना दोन मुलं आहेत. काही महिन्यांपूर्वी ती 'बकेट लिस्ट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

Indrayani River : ‘इंद्रायणी-पवना सुधार’ निविदेसाठी सल्लागार, चार महिन्यांत कार्यवाहीनंतर काम सुरू होणार; ‘पीएमआरडीए’ची माहिती

Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी डॉ. उमा वळसंगकरांचा मनीषा मानेंविरुद्ध नवा अर्ज; आर्थिक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

SCROLL FOR NEXT