sahil vaid 
मनोरंजन

''शेरशाह' चित्रपट मी नाकारला पाहिजे होता'; अभिनेत्याची खंत

चित्रपटात साहिलने साकारली कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या मित्राची भूमिका

स्वाती वेमूल

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा Siddharth Malhotra आणि कियारा अडवाणी Kiara Advani यांच्या मुख्य भूमिका असलेला 'शेरशाह' Shershah हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात सिद्धार्थने कारगिल युद्धातील कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली. तर अभिनेता साहिल वैदने Sahil Vaid विक्रमचा खास मित्र सनी याची भूमिका साकारली. मात्र या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्याने नाराजी व्यक्त केली आहे. "सनीची भूमिका साकारावी की नाही या द्विधा मनस्थितीत असताना मी होकार दिला. पण माझ्या भूमिकेची दखलसुद्धा कोणी घेतली नाही. त्याऐवजी एखाद्या जवानाची भूमिका साकारली असली तर चांगलं झालं असतं," असं त्याने बोलून दाखवलं.

'झूम' वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत साहिल म्हणाला, "मला देण्यात आलेली भूमिका खूपच छोटी असल्याने ती करण्याची माझी इच्छा नव्हती. त्याऐवजी मला एखाद्या जवानाची भूमिका द्या, असं मी दिग्दर्शकांना सांगितलं. कारण मला कोणीच तशा भूमिकेत पाहिलं नाही. पण दिग्दर्शकांना मी सनीच्या भूमिकेसाठी योग्य वाटलो. धर्मा प्रॉडक्शनचा मी खूप आभारी आहे. त्यांनी मला हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ आणि बद्रिनाथ की दुल्हनियाँ या चित्रपटांमध्ये चांगल्या भूमिका दिल्या होत्या. त्यांचे आभार मानण्यासाठी मी शेरशाहमधील सनीची भूमिका साकारली होती."

"शेरशाहबद्दल अनेकजण बोलत आहेत, पण सहाय्यक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांविषयी कधीच बोललं जात नाही. कॅप्टन विक्रम बत्रा यांना आदरांजली वाहण्यासाठी काही बड्या कलाकारांनी आपला अहंकार बाजूला ठेवून या चित्रपटात छोट्या भूमिका साकारल्या आहेत. मीसुद्धा याच कारणासाठी छोटी भूमिका स्विकारली पण मला आता असं वाटतंय की मी ती भूमिका करायला पाहिजे नव्हती. माझ्या कामाची दखलसुद्धा कोणी घेतली नाही", अशी खंत त्याने व्यक्त केली.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या 'दिल बेचारा' या चित्रपटातही साहिलने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. करण जोहर सहनिर्मित आणि विष्णू वर्धन दिग्दर्शित 'शेरशाह' या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

SCROLL FOR NEXT