Sonam Kapoor Posts image Google
मनोरंजन

दोन महिन्यांपासून प्रेग्नेंट सोनम चाहत्यांना देत होती 'Hint'; म्हणायची...

सोनम कपूरनं नवरा आनंद अहुजासोबतचा फोटो शेअर करीत ती प्रेग्नेंट असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून २१ मार्च,२०२२ रोजी सांगितलं.

प्रणाली मोरे

सोनम कपूर(Sonam Kapoor)नं आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आई होणार असल्याची बातमी दिली आहे. ही बातमी देतानाच तिनं नवरा आनंद अहूजासोबतचा फोटो देखील शेअर केला आहे. तिनं एकदम हटके स्टाईलमध्ये ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. फोटोत तिनं मोनोकिनि घातली आहे. तिचा नवरा आनंद अहूजाच्या मांडीवर ती डोकं ठेवून निवांत पहुडलेली फोटोत दिसत आहे. फोटोत लक्ष वेधून घेतेय सोनमनं पोटाला प्रेमानं कवटाळलेल्या हाताची पोझ. सोनम नेहमीच तिच्या पोस्ट शेअर करताना त्यात एक वेगळेपणा आणताना दिसते. ही तर तिच्या आयुष्यातील आनंदाची बातमी हटकेपणा तर तिच्याकडून अपेक्षित होताच.

पण आता तिचे काही जुने फोटो आणि पोस्ट व्हायरल होतं आहेत. ज्यात तिनं म्हणे नकळत आपण प्रेग्नेंट असल्याचं सूचित केलं होतं.या वर्षात फ्रेब्रुवारी महिन्यात सोनमनं तिच्या mood swing संदर्भात एक पोस्ट केली होती. खरंतर प्रेग्नेंसी मध्ये सर्वच स्त्रियांच्या बाबतीत ही गोष्ट घडतेच. तेव्हा सोनमनं त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं,''माझ्या नवऱ्याच्या मते मी खूपच क्यूट आहे,अगदी रडवेल्या अवतारात असली तरी''. तेव्हा सोनमनं तिच्या बदलणाऱ्या मूडविषयी सांगितलं होतं. आणि त्यावेळचा तिचा तो मूड आनंद अहूजानं कॅप्चर केला होता. ते फोटो सोनमनं शेअर केले होते. सोनमची ती पोस्ट आणि चाहत्यांना त्या माध्यमातनं दिनं दिलेली Hint बातमीत जोडलेली आहे. नक्की पहा.

Sonam Kapoor with family(pictures)

सोनम कपूर फॅशन आयकॉन आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. ती नेहमी तिचे स्टायलिश फोटोशूट शेअर करताना दिसते. पण Mood Swing पोस्टच्यावेळी देखील तिनं काही जुने फोटो शेअर केले होते. अर्थात एका स्पेशल डेटला तिला तिची आई होण्याची बातमी जाहीर करायची होती आणि खास फोटोही त्याचवेळी शेअर करायचे होते म्हणून असेल कदाचित. पण तिनं सूचित मात्र नक्कीच केलं होतं की ती आई होणार आहे.

Sonam Kapoor with husband Anand Ahuja

काही महिन्यांपासून सोनम घालत असलेले कपडे आणि चप्पलवर लक्ष गेलं तर एक गोष्ट नक्कीच लक्षात येईल की त्या फोटोत ती सैल कपड्यांमध्ये आणि फ्लॅट चप्पल,शूजमध्ये दिसत आहे. साधारण जानेवारी-फेब्रुवारी माहिन्यापासून तिच्यामध्ये झालेला हा मोठा बदल दिसून येईल. कारण सोनमला नेहमीच वेस्टर्न आऊटफिट्स आणि हिल्स घालायला आवडतात हे तिच्या आतापर्यंतच्या फॅशन स्टाईलला पाहिल्यावर प्रकर्षांने कळते. त्यामुळे सध्या तिचे हे निवडक फोटो आणि पोस्ट्स तिच्या प्रेग्नेन्सीच्या बातमीनंतर जोरदार व्हायरल होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT